SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार 'भारत पर्व 2026'प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगीत तालीमसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रमशाहू वस्तुसंग्रहालय खुले करा, ...अन्यथा शाहू जन्मस्थळ येथे सोमवारी शाहूप्रेमी कोल्हापूरकरांचा उपोषणाचा इशारापश्चिम विभागीय अन्वेषन संशोधन स्पर्धा २०२५ -२६ मध्ये शिवाजी विद्यापीठाचे यश हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी”डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे शुक्रवारपासून राष्ट्रीय कार्यशाळा'थेट बाजारपेठ व्यवस्थापन' मोफत प्रशिक्षण २७ जानेवारी पर्यंत नावनोंदणीची संधी शिवाजी विद्यापीठात ‘भारतीय विद्येचा परिचय’अभ्यासक्रम उत्साहातकवी होण्याची पूर्वअट म्हणजे माणूस होणे : अजय कांडर; विद्यापीठातील ‘कविकट्टा’ झाला काव्यमय!

जाहिरात

 

डॉ. हर्षवर्धन पंडित यांना आंत्रप्रेन्योरशीप एक्सलन्स पुरस्कार

schedule05 Dec 25 person by visibility 197 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील डॉ. हर्षवर्धन चंद्रकांत पंडित यांना बौद्धिक संपदा हक्क प्रशिक्षण आणि परिसंस्था सक्षमीकरण या क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणे येथे ‘आंत्रप्रेन्योरशीप एक्सलन्स अॅवॉर्ड-२०२५’ प्रदान करण्यात आला. 

आंत्रप्रेन्योरशिप स्टार्टअप अँड इनोव्हेशन फोरम, पुणे (ईएनएसआयएन) आणि  विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे (व्हीआयटी) यांच्यातर्फे आयोजित संयुक्त कार्यक्रमात पंडित यांना ३ डिसेंबर रोजी हा पुरस्कार देण्यात आला. विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूटच्या सभागृहात पुष्कराज समूहाचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र गोस्वामी आणि फोरमचे चेअरमन डॉ. कल्लूरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्ही. आय. टी.चे संचालक डॉ. राजेश जालनेकर, शिरीष कुलकर्णी, संतोष रंजन, संजय जगताप, डॉ. माने आदी उपस्थित होते. 

डॉ. हर्षवर्धन पंडित बौद्धिक संपदा (IP) जनजागृती, पेटंट प्रक्रिया प्रशिक्षण, प्रायर-आर्ट सर्च, TRL उन्नयन आणि स्टार्टअप इकोसिस्टम विकास या क्षेत्रांत काम करीत आहेत. अनेक विद्यार्थी, संशोधक आणि नवउद्योजकांना पेटंट, डिझाइन, आणि IP फाइलिंग प्रक्रिया समजून देण्यात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत डॉ. पंडित यांनी मदत केली आहे. 

डॉ. पंडित यांना शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर तसेच  मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग समन्वयक डॉ. प्रवीण प्रभू यांचे प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes