अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार; सुदैवाने बचावले
schedule14 Jul 24 person by visibility 408 categoryविदेश
नवी दिल्ली : पेनसिल्व्हेनियामध्ये एका प्रचार रॅलीदरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला. गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला लागली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवले आणि कारमध्ये नेले. गोळीबारातील हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे.
हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या कानातून रक्त येत असल्याचे दिसले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात एक ट्रम्प समर्थक ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच एका अज्ञात हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध केला आहे. "अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही," असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिका नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. सध्या ट्रम्प आणि बायडेन निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.
ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.