SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'गोकुळ' निवडणुकीत विश्वासाचा घात; महायुतीचे नेते स्वतःच्याच कार्यकर्त्यांवर अविश्वासी : आ. सतेज पाटील यांचा घणाघातपुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कौस्तुभ गावडे यांची सोलापूरमध्ये दमदार मोर्चेबांधणी!महायुतीची वज्रमूठ पक्की! कोल्हापुरात प्रचाराचा बिगुल वाजला, विजयाचा दावा ठामसंकलित मूल्यमापन चाचणी (PAT-2) - गुणवत्ता वाढीचा मूलाधार : डॉ. अजितकुमार पाटीलमोरेवाडी येथे स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र कार्यान्वित; योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहनमहाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळातर्फे नागाळा पार्कमध्ये १९ ऑक्टोबरला भव्य दांडिया सोहळा!पवित्र पोर्टलद्वारे नियमित शिक्षक भरतीसाठी कटिबद्ध; रिक्त पदांची १०० टक्के भरती करण्यासाठी पाठपुरावा करणार : कौस्तुभ गावडेजागतिक अन्न दिन: अन्नाची नासाडी रोखण्याची आणि भूकमुक्तीची प्रतिज्ञागांधीनगरमध्ये टायर पेटवून रिपब्लिकन पक्षाचा जोरदार ‘रास्ता रोको’!पोस्ट ऑफिसमधून दिवाळीचा फराळ परदेशात पाठविणे आता अधिक सुलभ

जाहिरात

 

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

schedule14 May 24 person by visibility 690 categoryराज्य

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले.

 त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

   मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes