SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून स्ट्राँगरुम व चार क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची पाहणीकेंद्रीय मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरीनूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छाएसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीमअमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील तीन एकर जमीनडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग इनोव्हर्स २.० राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमडॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांना दुहेरी आंतरराष्ट्रीय सन्मानमतदार जनजागृतीसाठी यशवंतराव चव्हाण के.एम.सी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, मानवी साखळीश्री अंबाबाई मंदिर परिसर सुरक्षा व सोयी-सुविधांबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून पाहणीरामानुजन यांचे गणितातील योगदान महत्वाचे : प्रा. डॉ. एस. एच. ठकार

जाहिरात

 

शिरोली-सांगली मार्गावर आणखी किती बळी हवेत? अधिकाऱ्यांकडे कैफियत; 'घोडावत'च्या विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

schedule11 Sep 24 person by visibility 402 categoryराज्य

जयसिंगपूर : कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातून कराच्या रूपाने कोट्यवधीचा महसूल शासनाच्या तिजोरीत जातो. तरीही शिरोली-सांगली 'घात'रुपी महामार्ग वाहतुकीसाठी असुरक्षित बनला आहे. विद्यार्थ्यांसह प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कोटयवधीचा कर देऊनही मार्गावर मरणयातना भोगाव्या लागत आहेत. दिवसेंदिवस अपघात आणि बळी जात असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर मार्ग दुरुस्त होणार अशी विचारणा करत सुरक्षित मार्गासाठी आता आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा, संजय घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांना दिला आहे. 

 सांगली-कोल्हापूर महामार्गाचे प्रचंड दुरावस्था झाली आहे. शिवाय मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने सातत्याने अपघात होत आहेत. अतिग्रे येथील घोडावत विद्यापीठात वीस हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने या विद्यार्थ्यांना या महामार्गावरून प्रवास करताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गाची दुरूस्ती तातडीने करावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनही विद्यार्थ्यांच्यावतीने राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांना देण्यात आले. 

  निवेदनात असे म्हटले आहे की, सांगली-कोल्हापूर महामार्ग हा राष्ट्रीय महामार्गात विलीन झाला आहे. गेल्या वर्षाभरापासून या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्याने सातत्याने अपघात होत आहेत. यात शालेय विद्यार्थ्यांबरोबर अनेकांचा बळी गेला आहे. यापूर्वी उद्योगपती संजय घोडावत यांनी उदगांव टोलनाक्यावर आंदोलन करून सुमारे चार तास महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतर या महामार्गाची दुरूस्ती झाली होती. 

 सध्याही या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत असताना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आठ दिवसांत या रस्त्याची खड्डे भरून दुरूस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू.  

    निवेदनावर रितेश शिंदे, सोमनाथ पाटील, शिवम वाघे, तन्वी सोनी, ओम पाटील, वेदांत जोशी, निहाल नाईक, ऋतूजा जाधव, अनिकेत पटेल, निखिल कुंभार, अभिषेक मगदूम, आशिष कोगनाळे यांच्यासह विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत. 

▪️बी.ए.आय. डी. एफ.चा पाठिंबा 
विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या या आंदोलनास बिझनेस अँड इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट फोरम कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, जयसिंगपूरच्या सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे. विद्यार्थी आणि बी.ए.आय. डी. एफ. च्या माध्यमातून आंदोलन करून याप्रश्नी जाग आणली जाणार आहे.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes