SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक आर्थिक विकासाचा कणा: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगसमतेचा महामेरू, लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कागलमध्ये अभिवादनगोकुळ वाचविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटील यांची साद शाहू महाराजांच्या विचारांवरच जयसिंगपूर शहराची वाटचाल : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरशाहू विचारांच्या जतनासाठी स्मारक नव्या रूपात नागरिकांना समर्पितकोल्हापूर जिल्ह्यासाठी आपत्कालीन स्वच्छता प्रतिसाद कक्ष (ERSU) स्थापन; विशेष वाहनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणशिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू जयंती उत्साहात डीकेटीईच्या १४ विद्यार्थ्यांची फिन्युलेंट कंपनीत आकर्षक पॅकेजवर निवडसामाजिक न्याय दिनी शाहू महाराजांच्या जयघोषात समता दिंडी उत्साहातराजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन

जाहिरात

 

पन्हाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, जनसुराज्य शक्ती युतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील : खासदार धनंजय महाडिक यांचा विश्‍वास

schedule29 Nov 25 person by visibility 398 categoryराजकीय

कोल्हापूर : पन्हाळा गिरीस्थान नगरपालिकेचा प्रचार सध्या जोर धरू लागला आहे. दहा प्रभागातील २० जागांसाठी ही निवडणूक असून, २ डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. जनसुराज्य शक्ती पक्ष आणि भाजप यांच्या युतीमार्फत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक पन्हाळगडावर उपस्थित होते. त्यांनी उमेदवारांच्या  भेटीगाठी घेत पन्हाळकरांशी संवाद साधला.

पन्हाळा नगरपालिकेची निवडणूक २ डिसेंबर रोजी होत आहे. एकूण वीस जागा   असून, भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे ६ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. उर्वरित १४ जागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या तसेच नागरिकांच्या भेटीसाठी घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक हे पन्हाळगडावर  होते. त्यांनी उमेदवारांच्या भेटी घेतल्या. शहरातून पदयात्रा काढत त्यांनी लोकांशी संवाद साधला. 

त्यावेळी पन्हाळगडावरील नागरिकांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले. दरम्यान २८ नोव्हेंबर १६५९ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी, पन्हाळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. पन्हाळगड जिंकण्यापूर्वी केवळ अठरा दिवस अगोदर प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. म्हणजे अफजलखानाच्या वधानंतर केवळ अठरा दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. या घटनेच्या स्मृतींना उजाळा देत खासदार धनंजय महाडिक यांनी पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये शिवप्रतिमेचे दर्शन घेतले. युतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes