SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चेहऱ्यावरचे हसू अनमोल: जागतिक स्माइल दिन विशेषआवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभकिशोर घाटगे यांना ‘इंटरनॅशनल शांती दूत समाजरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर; ६ ऑक्टोबर रोजी दिल्लीत वितरण महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादनशाश्वत अभियांत्रिकीच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवा : कुणाल जगदाळेमहात्मा गांधी जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने ‘स्वच्छता दिवस’ उत्साहात साजरामहात्मा गांधीजींचे विचारच नवतरुणांना प्रेरणा देत राहतील: डॉ. अजितकुमार पाटील - कसबा बावड्यात महात्मा गांधी जयंती व स्वच्छता दिन उत्साहात महापालिकेच्यावतीने माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी‘गाथा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची’ ग्रंथ भावी पिढ्यांच्या चारित्र्यनिर्मितीचा दीपस्तंभ : डॉ. माणिकराव साळुंखे यांचे प्रतिपादनसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला ‘सीफोर स्कूल एक्सलन्स अवॉर्ड 2026'

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात

schedule15 Aug 24 person by visibility 626 categoryराज्य

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात ७८ वा स्वातंत्र्यदिन आज रॅली, सेल्फी पॉइंट्स आदी उपक्रमांसह मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. 

आज सकाळी ठीक आठ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वजास वंदन करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या परेडद्वारे राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत यांचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील विविध ठिकाणी आज़ादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले होते. सेल्फी पॉइंट्सवर छायाचित्रे घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनीनसह शिक्षक, अधिकारी आणि प्रशासकीय सेवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तत्पूर्वी, आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिन रॅलीस कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी फ्लॅग-ऑफ करून रॅली मध्ये सहभाग घेतला. 

याप्रसंगी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचार्य विभागाचे संचालक डॉ.सागर डेळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परूळेकर, सुरक्षा अधिकारी वसंत एकले यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक, अधिविभाग प्रमुख, विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित झालेले परदेशी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चहापानाने या उपक्रमांची सांगता झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes