SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जल धोरण आणि जलसंपत्ती दिन​के.एस.बी.पी. पार्क परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईसामाजिक न्याय विभागाकडून लाभार्थ्यांना साहित्य वाटपसीएसआरद्वारे शहर विकासासाठी बँकर्सनी साथ द्यावी : आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहनडी. वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या डिझाइन्सचे बुधवारपासून प्रदर्शनकोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात युरेका-जिज्ञासाचे आयोजन; राष्ट्रीय स्तरावरील शोध निबंध, प्रोजेक्ट व प्रेझेंटेशन स्पर्धानुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून विविध प्रकल्पांची पाहणीकोल्हापुरातील अनधिकृत बांधकामे अतिक्रमणांबाबत कोल्हापूर नेक्स्टचे महापौर यांना निवेदनपदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागरकोल्हापुरात महापालिकेविरोधात 'बोंबमारो'चा कडकडाट; अमृत २.० च्या रखडलेल्या कामावरून भारतीय दलित महासंघ रस्त्यावर

जाहिरात

 

नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्याभाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा : सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

schedule08 Apr 26 person by visibility 219 categoryराज्य

 मुंबई : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज ठेवण्याचे निर्देश  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले .

आरोग्य मंत्रालयातील समिती कक्षात आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी नाशिक परिमंडळाचे उपसंचालक डॉ. कपिल अहिर व परिमंडळातील  अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, यंदा सिंहस्थ पर्वणी निमित्त नाशिक मधील विविध घाटावर अंदाजे १२ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी, कुंभमेळा प्राधिकरण आणि विविध विभागांच्या समन्वयातून त्र्यंबक, रामकुंड, सीता गुंफा, साधू धाम, मुक्ती धाम व इतर धार्मिक स्थळावर आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात यावा.  लवकरच स्वतः नाशिक येथे भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सिंहस्थ पर्वणी काळात होणाऱ्या गर्दीमुळे नेटवर्क  यंत्रणेत अडचणी निर्माण होऊ नयेत, अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी वॉकी-टॉकीचा वापर करणे बाबत तसेच  नियंत्रण प्रणाली उभारण्या बाबत सुचना दिल्या आहेत. 

 देशभरातून येणाऱ्या भाविकांनी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी. आरोग्य सेवा व्यवस्थापनासाठी विविध स्तरांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापक तयारी करण्याचे निर्देशही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

कुंभमेळ्याच्या दरम्यान  रोगराईचा प्रसार रोखण्यासाठी नाशिक, त्र्यंबक, रामकुंड, सीतामंडी व इतर सर्व धार्मिक स्थळावरील स्वच्छतेवर विशेष भर द्यावा.  पाण्याच्या स्रोतांची तपासणी करावी. ‘आरोग्य रक्षक किट’ व पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes