+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustबापट कॅम्पमधील मूर्तिकारांना मार्केट यार्डात निवारा शेड उपलब्ध करा : सतेज पाटील यांच्या सूचना; पूरग्रस्त भागाची केली पाहणी adjustकाँग्रेसच्या समन्वय समितीत आमदार सतेज पाटील adjustबनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी - राज्यपाल रमेश बैस adjustराज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस रजत जयंती समारोह साजरा adjust'‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस adjustघाबरुन न जाता वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करा; शासन आपल्या पाठीशी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला पूरग्रस्तांना धीर adjustकोल्हापुरातील पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प परिसराती 228 नागरीकांचे स्थलांतर adjustकारगिल ऑपरेशन विजय भारतीय जवानांच्या शौर्याचे प्रतीक : कॅप्टन डॉ. अमित रेडेकर; के.एम.सी. कॉलेज व गोखले कॉलेज यांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा adjustडीकेटीईच्या १४ टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची रिड अँण्ड टेलर कंपनीमध्ये निवड adjustबगॅसपासून वीज निर्मिती करणार्‍या साखर कारखान्यांना राज्य आणि केंद्र शासनाकडून अनुदान मिळावे, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी
1000867055
1000866789
schedule29 Jul 22 person by visibility 1199 categoryआरोग्य
दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (२५ ते ३१ जुलै) ORS सप्ताह जगभरात साजरा केला जातो. तसेच २९ जुलै हा ORS दिन म्हणून साजरा होतो. सर्व सरकारी दवाखाने, उपकेंद्र शासकीय रुग्णालये या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत या सप्ताहानिमित्त 'ओआरएस वीक' जन जागृती अभियानांतर्गत अनेक उपक्रम हाती घेत असतात. दवाखान्यात येणाऱ्या सर्व पालकांना कर्मचारी ORS चे फायदे, ते कसे तयार करायचे, कसे पाजायचे याची प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती करतात. अतिसार, इतर पाण्यामुळे होणारे रोग याविषयी पोस्टर, रांगोळी, तख्ते याद्वारे माहिती दिली जाते. लहान बाळांना अनेकदा अतिसार आणि उलट्यांचा त्रास होतो आणि हा त्रास जीवघेणाही ठरू शकतो. अशावेळी ओआरएस हे बाळासाठी संजीवनी असते.

बालपणातील अतिसारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी व याव्दारे लाखो मुलांपर्यत पोहचण्यासाठी सन २०१४ पासून देशात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत आहे. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर पोहोचविणे हे IDCF चे अंतिम ध्येय आहे.

🔸IDCF ची उद्दिष्टे- IDCF ही उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये पूर/ नैसर्गिक आपत्ती दरम्यान अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारची पूर्वतयारी आहे. याची उद्दिष्टे -अतिसार असलेल्या सर्व मुलांना ORS आणि झिंकचे वाटप होईल व त्यांच्यापर्यत ते पोहोचेल हे सुनिश्चित करणे. पाच वर्षाखालील मुलांना अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे, काळजी घेणा-यांचे योग्य समुपदेशन करणे. अतिजोखमीचे क्षेत्र आणि दुर्बल घटकांवर विषेश लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

🟥 IDCF-2022 मधील राबवावयाचे विविध उपक्रम -
🔸समुदाय / गाव स्तरावर :
कुटुंबाना ओआरएसचे वाटप (प्री पोझिशनिंग) आणि ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवणे.
VHSND दरम्यान अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापन यावर आशा, AWW, ANM ग्रामीण विकास /जलशक्तीचे प्रतिनिधी यांच्याद्वारे IPC उपक्रम राबविणे, शाळा आउटरीच सत्र, VHNSD आणि AWCs येथे हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवणे. शहरी भागंसाठी आणि जेथे पोहोचणे आहे अशा दुर्गम भागाकरीता अतिसार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत फिरत्या आरोग्य पथकांची स्थापना करणे.

🔸आरोग्य केंद्र / सुविधा स्तरावर- अतिसारावर उपचार करण्यासाठी ORS आणि झिंक कॉर्नरची स्थापना. प्रशिक्षण व उपचाराचे निकष याद्वारे अतिसाराच्या रुग्णाचे योग्य व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यात यावे. आरोग्य केंद्रामधील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे.

🟥 ORS म्हणजे काय :
ORS सर्वच मातांना माहिती असेल, ORS म्हणजे (oral rehydration solution) मुख्यत्वे ORS चे मिश्रण म्हणजे पाणी (उकळलेले) साखर व मीठ याला जल संजीवनी असेही म्हटलं जातं. तर ही जलसंजीवनी का दिली जाते? ही जल संजीवनी डायरिया या रोगात शरीराच्या बाहेर पडलेले पाणी भरून काढण्यासाठी उपयोगी पडते. ५ वर्षाच्या आतील बालकांना अतिसाराचा त्रास होतो आणि भारतासारख्या देशात त्याची संख्या जास्त आहे. जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि क्षार बाहर पड़तात आणि बाळाचा मृत्यूही होऊ शकतो. हे रोखण्यासाठी बाळाला ORS देणे अत्यंत गरजेचे असते. ORS यावर खुप प्रभावी उपाय आहे. तेव्हा अगोदर ORS द्यावे आणि त्यानंतर मग डॉक्टरकडे घेऊन जावे. ORS: हे बाळासाठी अमृत होय.

🟥 ORS चा इतिहास व उपयुक्तता : जागतिक आरोग्य संघटनेने १९७८ मध्ये ओआरएसचा जागतिक अतिसार रोग नियंत्रण कार्यक्रम सुरू केला आणि अतिसारामुळे होणारे मृत्यू कमी करण्याचे अल्पकालीन उद्दीष्ट ठेवले. पुढे १९९० सालापासून जगभरात याचा व्यापक प्रसार झाला. ज्यामुळे लाखो बाळांचे अतिसारामुळे होणारे मृत्यू टळले. २००९ पासून ORS बरोबर झिंक देणेही सुरू झाले ज्यामुळे अतिसार नियंत्रण अधिक प्रभावी झाले.

ओआरएस हे सर्वात प्रभावी रीहायड्रेशन द्रावण आहे, कारण त्यात ग्लुकोज आणि सोडियमचे उत्तम संतुलन असते. सोडियम ग्लूकोज पंप सक्रिय करण्यासाठी याची मदत होते. ओआरएस अतिसार थांबवित नाही, परंतु यामुळे हरवलेल्या द्रव आणि आवश्यक क्षारांची जागा घेते. ज्यामुळे डिहायड्रेशन रोखले जाईल किंवा इतर उपचार प्रभावी होईल आणि जीवास कमी धोका होईल. ओआरएस सोल्यूशनमध्ये असलेले ग्लुकोज आतड्यांना द्रव आणि क्षार अधिक कार्यक्षमतेने शोषून घेण्यास सक्षम करते.

🟥 ओआरएस सोल्यूशन अतिसारावर गुणकारी पेय :
जेव्हा मुलांना उलटी किंवा अतिसार होतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा व गुणकारी उपाय म्हणजे ओ आर एस सोल्युशन हे फार्मसीत डब्ल्यू एच ओ आर एस पावडर म्हणून मिळते. छोटा साचैट एक ग्लास स्वच्छ पाण्यात टाकून तयार करतात. तसेच मोठे पाकिट एक लिटर म्हणजेच पाच ग्लास स्वच्छ पिण्याच्या पाण्यात टाकून बनवतात. घरीच जर ओ आर एस बनवायचे झाले तर एक लिटर स्वच्छ पिण्याच्या पाण्यात सहा चमचे साखर व अर्धा चमचा मीठ टाकून बनवावे. त्याची चव अश्रू एवढी खारट असायला पाहिजे. साखर जास्त झाली तर डायरिया वाढू शकतो. मीठ जास्त झाल्यास बाळ ते पिऊ शकत नाही.

ओ आर एस चे पावडर फक्त स्वच्छ पाण्यातच मिसळावे. दूध, सूप, फळांचा रस यामध्ये मिसळू नये किंवा त्यात अजून साखर सुद्धा मिसळू नये. तीन ते चार वेळा पातळ संडास झाल्यास ओ आर एस चे पाणी पाजणे सुरू करावे. दोन वर्षाखालील मुलांसाठी पाव ते अर्धा कप ओ आर एस घोळ व दोन वर्षावरील मुलांसाठी अर्धा ते एक कप प्रत्येक पातळ संडाससाठी द्यावा.

हगवण खूप जास्त आहे आणि आणि बाळाला दिवसातून पाच ते सहा वेळेपेक्षा कमी सू होते आहे, खूप जास्त उलट्या होत असल्यास, खूप चिडचिड करीत असल्यास, सुस्त पडल्यास, डोळे व टाळू खूप आत गेल्यासारखे दिसल्यास, जीभ कोरडी पडली असल्यास. झटके आल्यास डॉक्टरकडे जावे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार जगात दुसऱ्या क्रमांकाने ५ वर्षाच्या आतील लहान मुलं ही अतिसारामुळे (जुलाब) दगावत असतात, आणि भारतासारख्या देशात याची संख्या तर जास्तच आहे. अतिसार / जुलाब- उलट्या होण्याची मुख्य कारण पोटामध्ये विषाणू-जिवाणू जाणे! त्या जंतूंशी लढताना, शरीरातून त्या जंतूंना मलाद्वारे, उलटीद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न होतो. त्यामध्ये पाणी आणि क्षार भरपूर प्रमाणात शहराबाहेर फेकल्या जातात. म्हणजेच जुलाब होय. यात अस्वच्छता, दूषित पाणी, बाळाने अजाणतेपणी तोंडात घातलेल्या अस्वच्छ वस्तू, इतक्या तान्ह्या बाळाला खेळण्यासाठी देण्यात येणारी खेळणी या वस्तूमधील बॅक्टेरीया (जिवाणू) व्हायरस (विषाणू) तोडाद्वारे पोटात शिरतात. आणि ती न दिसणारी घाण पोटात गेल्यावर जुलाब आणि उलट्या होतात. यात कधीकधी बाळाचा मृत्यूही होऊ शकतो.

स्तनपानाऐवजी बाटलीने दूध पाजणे हेही बाळाला अतिसार होण्याचे महत्वाचे कारण आहे. आपल्याकडे काही मातांचा असा समज आहे की, दात येत असल्यामुळे बाळाला असे होत असते. त्यामुळे एक तर त्याच्याकडे होईल बरं असं म्हणून दुर्लक्ष केलं जातं किंवा दात येण्यासाठी "औषध" दिली जातात. पण खरं म्हणजे दात येण्याचा व जुलाबाचा काहीच संबंध नसतो. अशा जुलाबामुळे शरीरातील पाणी, क्षार बाहेर पडत असल्यामुळे बाळासाठी सर्वात आवश्यक असते क्षार आणि पाणी.. आणि Oral Rehydration solution (ORS) किंवा जलसंजीवनीमध्येही पाणी, साखर, मीठ यांचे प्रभावी प्रमाणात मिश्रण असते. त्यामुळेच जलसंजीवनी हे काम उत्तम प्रकारे करू शकते! जर जुलाब-उलटी होत असतानाच बाळाला ORS चे पाणी पाजायला सुरवात केली तर बाळाचे जुलाब तर थांबतातच, पण आपण बाळाला मृत्यूपासूनसुद्धा वाचवू शकतो. तेव्हा याविषयी जनतेने दक्ष व जागरूक आणि सज्ञानी राहायला हवे.

दोन वर्षापूर्वी कोरोना प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रम शक्य नव्हते. आता कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यामुळे खेडोपाडी छोट्या सभा, रॅली घेऊन प्रत्यक्ष माहिती देणे, ध्वनिक्षेपीत माहिती प्रसारित करणे, आकाशवाणी, दूरदर्शनवर मुलाखती देऊन ORS ही पाकिटातील पावडर किंवा घरच्याघरी साखर, मीठ, पाणी यापासून कशी तयार करता येते ही सर्व माहिती शासकीय अधिकारी, कर्मचारी देत असतात. सर्व भाषिक वर्तमानपत्रातही ORS ची पूर्ण माहिती देणारे सविस्तर लेख प्रकाशित केले जातात. आपण पाहिलंच आहे की ORS हे मुख्यत्वे बाळाच्या डिहायड्रेशन (शरीरात पाणी व क्षार कमी होणे) ची समस्या दूर करण्यासाठी दिले जाते. आता या जलसंजीवनीविषयी थोडं जाणून घेऊ या. WHO ORS चे छोटे, मोठे पाकीट सर्व सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध असतात. सर्व मेडिकल स्टोअर्स मधूनही सहज मिळतात. एक ग्लास (२००ml) उकळून घेतलेल्या पाण्यात एक छोटे पाकीट आणि ५ ग्लास (१ लिटर) पाण्यात मोठे पाकीट टाकून नीट विरघळून घ्यावे. साधारणपणे जुलाबात निघालेल्या पाण्याच्या प्रमाणात ... छोट्या बाळास चमचा चमचा पाजावे. मोठ्या मुलांना पाव ते अर्धा कप पाणी कपाने किंवा ग्लासने देत राहावे. पाकीट उपलब्ध नसल्यास हे मिश्रण घरी ही तयार करता येते. व ही क्षारसंजीवनी बाळांसाठी एक वरदानच ठरले आहे..

✍️डॉ. एस.एफ. देशमुख, प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण, प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर