कोल्हापुरात रिक्षा चालकाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला
schedule04 Sep 25 person by visibility 232 categoryगुन्हे

कोल्हापूर : शहरातील हनुमान नगर पाचगाव रोड परिसरात आज (दि.४) सकाळी रिक्षा चालक मोहन पोवार याचा गळा चिरलेल्या अवस्थेत व अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खुनामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दरम्यान, खुन्याचा मागोवा घेण्यासाठी घटनास्थळाजवळील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत. या भीषण घटनेमुळे पाचगाव रोड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस अधिक तपास करत असून या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.