SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: घरफाळा थकबाकी व विनापरवाना वापरामुळे दोन मिळकती सील; महापालिकेची ३० लाखांची वसुलीमहायुतीच्या वतीने शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा व्यापक मेळावा उद्या बुधवारीकोल्हापूर महानगरपालिकेत गुंठेवारी नियमितीकरणासाठी १६ ऑक्टोबरला विशेष शिबिरसराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना शिबिराला प्रतिसादडी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘माइंडक्राफ्ट हॅकेथॉन’ उत्साहातगोकुळ निवडणूक : ३५ मतदान केंद्रांवर ५ हजार ४१८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; १९ ऑक्टोबरला मतमोजणीकोरे अभियांत्रिकीत ‘इल्लूमिनेट २०२६’ उद्योजकता कार्यशाळेचे यशस्वी आयोजनसायबर महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात गोकुळ धुमशान : “तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही" कोल्हापुरात दसरा महोत्सव शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

जाहिरात

 

अकिवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची खासदार धनजंय महाडिक यांनी घेतली भेट, २०१९ प्रमाणे याहीवर्षीच्या पुरग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही

schedule14 Aug 24 person by visibility 795 categoryराज्य

कोल्हापूर : अकिवाट - बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर, महापूराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटली आणि दोघांचा मृत्यू झाला. तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अजुनही बेपत्ता आहेत. त्या दुर्दैवी दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची मंगळवारी खासदार धनजंय महाडिक यांनी भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान २०१९ च्या पूराप्रमाणे यंदाही पूरग्रस्तांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

अकिवाट - बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होवून झालेल्या दुर्घटनेत सरपंच पती सुहास पाटील आणि माजी सरपंच आण्णासाहेब हसुरे यांचा मृत्यू झाला. तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अजुनही बेपत्ता आहेत. दुर्घटनाग्रस्त या कुटूंबियांची मंगळवारी खासदार धनजंय महाडिक यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले. त्या दुर्घटनेमुळे अजुनही अकिवाट गावात शोकमग्न वातावरण आहे. अशावेळी महाडिक परिवार आणि शासन आपल्या पाठिशी असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. या दुर्घटनेतून बचावलेले रामदास माने, सागर माने, अरूण कांबळे यांची खासदार महाडिक यांनी भेट घेतली. तर तिंघाना बुडताना वाचविणार्‍या ओंकार बागडी, आनंदा बागडी यांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

 दरम्यान अकिवाट - बस्तवाड दरम्यानचा रस्ता रूंद करून, पूराचे पाणी वेगाने वाहून जाण्यासाठी रस्त्याखालून पाईपलाईन टाकावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी अपघात स्थळाची पाहणी केली. २०१९ च्या पूराप्रमाणे यंदाही पुरग्रस्तांना शासन स्तरावरून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, उदय डांगे, अरविंद माने, अबीदीन मुजावर, रोहित तवंदकर, हरिश्चंद्र पाटील, संभाजी भोसले, पोपट पुजारी, आप्पासाहेब म्हैशाळे, भगतसिंग रजपूत, चंद्रकांत कुलकर्णी, संतोष लाटवडे, नंदकुमार निर्मळे, बाळासाहेब उमाजे, रमेशकुमार मिठारे, राजगोंडा पाटील, श्रीधर पवार, संदीप भाटणकर, आण्णासो कागले, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes