डॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2025' संपन्न
schedule09 Mar 25 person by visibility 223 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : येथील डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय. एस. टी.ई.),नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2025' विविध पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल ८१० स्पर्धकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाली. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सर्व सहभागींना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल मेंबर प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे होते. व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक विरेन भिर्डी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना डॉ. देसाई म्हणाले, " तांत्रिक स्पर्धांद्वारे तरुणांच्या उत्साहाला विधायक दिशा दिली पाहिजे. कौशल्य विकास आणि सक्षमता हाच नव्या युगाचा मंत्र आहे. अचूक दृष्टिकोन आणि संशोधक वृत्ती अभियंत्यास सक्षम बनवते. इंपल्स स्पर्धेने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वृद्धीसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे." अध्यक्षीय भाषणात कौस्तुभ गावडे यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांच्या सहभागाचे महत्त्व विषद करून ," शिक्षण, नाविन्याचा ध्यास आणि सुसंस्कार हे संबंधित असून त्याद्वारे समस्यांचे निराकरण झाले पाहिजे" असे प्रतिपादन केले.
या स्पर्धेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ग्रुप, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ग्रुप यांनी अत्याधुनिक तांत्रिक विषयांवर पेपर प्रेझेंटेशन केले तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी मॉडेल मेकिंग स्पर्धेमध्ये विविध प्रतिकृती तयार केल्या. क्विझ कॉम्पिटिशन आणि कोडींग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेचे नेटके नियोजन, भोजन व्यवस्था, आकर्षक बक्षिसे, विविध विषयांवरील माहितीचे आदान प्रदान यांची संधी मिळाल्यामुळे सहभागी स्पर्धकांनी समाधान व्यक्त केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
डिप्लोमा : स्पर्धेचे नाव (विजेता; उपविजेता)
पेपर प्रेझेंटेशन मेकॅनिकल इंजि. (शुभम देसाई; प्रीती गाडगीळ, मानसी सूर्यवंशी, स्नेहा गुरव, पियुष केसरी ,स्वराली पाटील)
पेपर प्रेझेंटेशन इलेक्ट्रिकल इंजि. (खुशी कोरी, कुमोदिनी बावबळ; सिद्धांत साळोखे सुजय मुद्देबिनल)
पेपर प्रेझेंटेशन कॉम्प्युटर इंजि. (प्रतिक कुंभार; पियुष केसरे, स्वराली पाटील सादिया भैरगदर)
पोस्टर प्रेसेंटेशन (अनन्या पवार; मिताली मोरे, मृणाल जदाळ),
सर्किट मेकिंग (दक्ष पंखज, सुजय कोळगे; ऋषिकेश कुंभार, तेजस पोवार),
क्विझ कॉम्पिटिशन (श्रमण पाटील, अभय हंचाटे; शुभम जाधव, आशुतोष आळवेकर),
कोडींग (अथर्व कुंभार, प्रज्वल पोखले; गायत्री सुतार, आदिती पाटील)
मॉडेल मेकिंग (जियान शरिकमस्तान ; साईराज शिंदे)
पदवी अभियांत्रिकी:
पेपर प्रेझेंटेशन कॉम्प्युर इंजि. (सानिया सय्यद, ऋत्विक कनोजिया; सानिया शेख, सिद्धी लाड)
पेपर प्रेझेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स इंजि. (ऋषी दुल्हानी; अमित देसाई सायली हिवरे)
पोस्टर प्रेसेंटेशन (सृष्टी नारायण, सई घोरपडे; नीलम साळुंखे, श्रेया आळवेकर)
सर्किट ब्रेकर (सानिका चोरडे , मधुरा देसाई; हर्षल गौडर ,बसवराज बिरादर, अनिकेत सोनवडेकर आकाश बिसेन)
कोडिंग (विनय कांबळे; श्रीरंग कुलकर्णी)
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे यांचे या स्पर्धेसाठी मार्गदर्शन मिळाले. याप्रसंगी तज्ञ परीक्षक, समन्वयक प्रा. प्रवीण भट, प्रा. गीता साळोखे, सहप्रायोजक, विद्यार्थी , विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थी स्वयंसेवकांनी या स्पर्धेमध्ये लक्षणीय सहभाग घेतला. इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. सुदर्शन महाडिक आणि प्रा. आरती चव्हाण यांनी केले.