SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
...आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटीलजलद बुद्धिबळ स्पर्धा रविवारी पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादनकोल्हापूर -राधानगरी मार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक, बहिण-भावासह तिघे ठार‘तू माझा किनारा’ चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी होणार प्रदर्शित!दक्षिण कोरियातील ‘२०२५ इंटरनॅशनल वर्कशॉप ऑन इंजिनिअरिंग’साठी डॉ. कारजिन्नी व डॉ. बोरचाटे यांना निमंत्रणअसरानी म्हणजे हुकमी मनोरंजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते असरानी यांना श्रद्धांजलीआरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी ‘वॉर रूम’ची स्थापनाराज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेप्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन

जाहिरात

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावर “उमंग २०२४ तांत्रिक स्पर्धेचे” आयोजन; इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला प्रेरणा मिळण्यासाठी पन्नास हजाराहून अधिक बक्षिसे

schedule21 Feb 24 person by visibility 410 categoryशैक्षणिक

जयसिंगपूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील “उमंग २०२४ भव्य तांत्रिक स्पर्धेचे” आयोजन दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ वेळ सकाळी १०.०० ते ५.०० या वेळात इन्स्टिट्यूटच्या ग्रीन कॅम्पस भव्य प्रांगणात करण्यात आले आहे. 

इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव नवीन दिशा मिळण्यासाठी पन्नास हजाराहून अधिक बक्षिसे या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली आहे. स्पर्धेतचे मुख्य विषय कॅड बस्टर्स, 3 डी टेक्निकल पोस्टर प्रेझेंटेशन, सर्किट्रीक्स सायफर हंट, सर्किट मास्टर, क्विझ कॉम्पीटिशन, अंताक्षरी स्पर्धांचे आयोजन केले असून स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या राष्ट्रीय स्तरावरील उमंग २०२४ भव्य “तांत्रिक स्पर्धेस आयटीआय, डिप्लोमा, डिग्री चे शिक्षण घेत असलेल्या आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप उद्योग करत असलेल्या नव उद्योजकास ही स्पर्धा खुली आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी विविध उद्योजकांनी स्पॉन्सरशिप दिलेली असून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. पांडूरंग पुजारी, प्रा. मनाली थोरूशे आणि टीम परिश्रम घेत आहेत.

 या स्पर्धेस संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट व्ही गिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes