SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मधुमेहग्रस्त सात वर्षांच्या साक्षी वर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियाकेंद्रीय सहकार खात्याचे अ‍ॅडिशनल सेक्रेटरी पंकज कुमार बन्सल यांची कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास भेटमतदान केंद्रावरील ३२४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण यशस्वीप्रयत्नांच्या जोरावर यशाचे शिखर गाठा : माजी प्राचार्य विजय डोणे आठवणींना उजाळा, मैत्रीला नवा श्वास : कोरे; अभियांत्रिकी २००० बॅचचा रौप्यमहोत्सवसेंट्रल पार्कची कामे गतीने पूर्ण करा : उपमुख्यमंत्री अजित पवार; उपमुख्यमंत्र्यांकडून शहरातील विकासकामांची पाहणीशिवाजी विद्यापीठात दि. ३० डिसेंबर रोजी ‘संत साहित्य संमेलन’नवीन शैक्षणिक धोरण व शारीरिक शिक्षण आरोग्य याचे महत्त्व : ✍️ डॉ अजितकुमार पाटील, कोल्हापूरगडचिरोली पोलीस दलाच्या बळकटीसाठी 34 नव्या वाहनांचा ताफा दाखलश्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद

जाहिरात

 

केंद्रीय सहकार खात्याचे अ‍ॅडिशनल सेक्रेटरी पंकज कुमार बन्सल यांची कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास भेट

schedule28 Dec 25 person by visibility 64 categoryउद्योग

इचलकरंजी : भारत सरकारच्या सहकार खात्याचे अ‍ॅडिशनल सेक्रेटरी आणि नॅशनल को-ऑप. डेव्हलपमेंट कार्पोरेशन नवी दिल्लीचे मॅनेजींग डायरेक्टर पंकज कुमार बन्सल यांनी रविवारी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सदिच्छा भेट दिली.  बन्सल यांनी कारखान्याने केलेली नेत्रदिपक प्रगती आणि परिसर पाहून अतिशय आनंद झाल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या सुविद्य पत्नी  जी लथा आणि नॅशनल को-ऑप. डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या पुणे विभागीय ऑफिसचे रिजनल डायरेक्टर गिरीराज अग्निहोत्री, कर्नाटक विभागाच्या रिजनल डायरेक्टर  तनिशा लाल उपस्थित होत्या.

यावेळी पाहुण्यांनी कारखान्याच्या आवारामध्ये प्रवेश होताच मन प्रसन्न झाल्याचे सांगून एखाद्या कार्पोरेट क्षेत्रातील उद्योगांच्या परिसरापेक्षा साखर कारखान्याचा परिसर इतका स्वच्छ व सुंदर असू शकतो याचे जवाहर हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत महाराष्ट्रात सहकार चळवळ अतिशय चांगली रुजली असून कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, ज्येष्ठ संचालक प्रकाशराव आवाडे आणि आमदार राहूल आवाडे यांनी सार्वजनिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली. साखर उद्योगासमोरील आव्हाने व पुढील वाटचाल याबद्दल बोलताना पंकज कुमार बन्सल यांनी, जवाहर कारखान्याने दैनंदिन ऊस गाळप क्षमता 1016 वरून 16000 मे. टनापर्यंत आणि कारखान्याच्या सुरूवातीपासून को-जनरेशन प्रकल्प राबविल्याचा आवर्जुन उल्लेख केला. कारखान्याने साखर उत्पादनावर न थांबता या उद्योगामध्ये इथेनॉल, को-जनरेशन, सीबीजी अशा नवनवीन प्रकल्पांकडे वळणे आवश्यक आहे. तरच या उद्योगाची आर्थिक स्थिती चांगली होईल. तसेच भविष्यात बगॅसपासून इथेनॉल, नवनवीन उप उत्पादने घेण्यासाठी साखर उद्योगाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. ब्राझीलमध्ये बाजारपेठेमध्ये ज्यावेळी साखरेचा साठा कमी असतो, त्यावेळी 100 टक्के साखर किंवा ज्यावेळी इथेनॉलचा साठा कमी असतो त्यावेळी 100 टक्के इथेनॉल निर्मिती करण्यायोग्य साखर कारखाने उभारले आहेत.

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी स्वागत करुन कारखान्यास दिलेल्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पंकज कुमार बन्सल आणि गिरीराज अग्निहोत्री यांनी कारखान्याच्या कामकाजाची माहिती घेऊन एनसीडीसीकडून सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य करत असल्याचे सांगत कारखान्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शाल, फेटा आणि पुष्पहार देऊन पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, केन कमिटीचे चेअरमन दादासो सांगावे, कारखान्याचे सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक मनोहर जोशी, सर्व अधिकारी आदि उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes