डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पार्थ पाटीलला ब्रिटिश विद्यापीठाकडून 100% शिष्यवृत्ती
schedule10 Jun 24 person by visibility 656 categoryशैक्षणिक
▪️स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षण व संशोधनासाठी निवड
कोल्हापूर : येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी पार्थ विद्यानंद पाटील या युवा संशोधकास ख्यातनाम ब्रिटिश विद्यापीठ - 'युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम'कडून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या विषयांमधील उच्च शिक्षण व संशोधनासाठी १००% टक्के स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये ही शिष्यवृत्ती प्राप्त करणारा पार्थ हा एकमेव भारतीय विद्यार्थी आहे.
कोल्हापूर येथील कसबा बावडा येथील रहिवासी असलेल्या पार्थचे शालेय शिक्षण सेंट झेवियर्समध्ये झाले. डॉ. डी वाय पॉलिटेक्निक येथून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी विशेष प्राविण्यसह प्राप्त केली. त्याचे अनेक शोध निबंध विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले असून स्थापत्य अभियांत्रिकीमधील संशोधनासाठी पेटंट ही प्राप्त झाले आहे. डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी असणाऱ्या पार्थने अनेक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले असून 2022-23 चा "बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट" म्हणून गौरवण्यात आले होते. पार्थचे वडील गोकुळ दूध संघात सुपरवायझर म्हणून कार्यरत असून आई गृहिणी आहे.
जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरील स्थापत्य अभियांत्रिकीमधील जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पार्थ ने प्रगत देशात उच्च शिक्षण व संशोधनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. प्रा. अभय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार्थला इंग्लंड, अमेरिका,जर्मनी येथील विद्यापीठात प्रवेश मिळाला. त्याची शैक्षणिक कारकीर्द, गुणवत्ता, संशोधनातील सहभाग आदी गोष्टींची दखल घेत युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅमने त्याला उच्च शिक्षण व संशोधनासाठी 100% स्कॉलरशिप जाहीर केली आहे.
"युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम" संशोधनासाठी ख्यातनाम असून जगातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठात गणना होते. या विद्यापीठाकडून आऊटस्टैंडिंग परफॉर्मन्स असणाऱ्या जगभरातील युवा संशोधकांना ‘डेव्हलपिंग सोल्युशन्स मास्टर्स स्कॉलरशिप’ दिली जाते.
या शिष्यवृत्तीबद्दल डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, तसेच स्थापत्य विभाग प्रमुख डॉ. किरण माने मार्गदर्शन लाभले.