+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule08 Jul 24 person by visibility 340 categoryउद्योग
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील नवीन नोंदणी झालेल्या १३ प्राथमिक दूध संस्थांना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य यांच्या उपस्थितीत गोकुळच्या ताराबाई पार्क, कार्यालय येथे संपन्न झाला.

यावेळी बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळने प्राथमिक दूध संस्‍था व दूध उत्‍पादक केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचा कारभार केला असुन प्राथमिक दूध संस्‍था पदाधिका-यांनी संस्था व दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा. तसेच संघाच्या विविध योजना सेवासुविधांचा दूध उत्पादकांनी लाभ घेऊन संघाच्या म्हैस दूध वाढीसाठी दूध संस्थांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार नूतन दूध संस्था प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, सागर माने (कवठेसार), प्रदिप उलागडे (अकिवाट) सचिन पाटील (दोनोळी), शक्ती पाटील (उदगाव), सागर हेरवाड (तेरवाड), सुनिल आळते (दत्तवाड), राजेश खोत (शिवनाकवाडी), सुरेश सावंत (चिंचवाड) व गोकुळचे सहा.दूध संकलन अधिकारी मुकुंद पाटील, सिनी.विस्तार सुपरवायझर सुहास डोंगळे तसेच विविध दूध संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.