महासैनिक दरबार हॉल येथे कंत्राटी पध्दतीने पद भरती
schedule03 Jun 25 person by visibility 254 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल, कोल्हापूर करिता अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर आहेत. माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य राहील. इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक 16 जून 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
▪️पदाचे नाव अशासकीय सहायक व्यवस्थापक/वसतिगृह अधिक्षक -एकत्रित मानधन 31 हजार 875 रुपये पद 1- अर्जदार जेसीओ पदावरुन सेवानिवृत्त असावा.
▪️सुरक्षा सुपरवायझर एंव सहायक व्यवस्थापक-2/सहायक वसतिगृह अधिक्षक - एकत्रित मानधन 24 हजार 875 रुपये, पद- 1, अर्जदार जेसीओ / हवलदार पदावरुन सेवानिवृत्त असावा.
▪️लिपिक व अतिरिक्त लिपीक/वसतिगृह सहायक अधिक्षक- एकत्रित मानधन 24 हजार 875 रुपये, पदे- 2, अर्जदार जेसीओ / हवलदार पदावरुन सेवानिवृत्त असावा.
▪️Multi Task Service (बहु कार्य सेवा) पदे –
वाहनचालक- 14 हजार 700 रुपये, पद 1,
वीजतंत्री -14 हजार 700 रुपये, पद 1,
प्लंबर -13 हजार 89 रुपये, पद 1,
माळी -13 हजार 89 रुपये, पद 1,
▪️सफाई कामगार (पुरुष)- 13 हजार 89 रुपये, पदे- 4,
▪️सफाई कामगार (महिला)- 13 हजार 89 रुपये, पदे 2,
▪️चौकीदार - 13 हजार 924 रुपये, पदे 7 इत्यादी रिक्त पदे आहेत.
प्राप्त अर्जांची पडताळणी करुन पात्र उमेंदवारांना मुलाखतीसाठी मोबाईलद्वारे कळविण्यात येईल. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांना राहतील. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे किंवा मोबाईल क्रमांक 9172035612 व दुरध्वनी क्रमांक 0231-2665812 वर संपर्क साधावा.