परिपूर्ण आणि जबाबदार नेतृत्व विकसित होणे गरजेचे: डॉ. विलास शिंदे
schedule23 Jan 26 person by visibility 52 categoryसामाजिक
▪️शिवाजी विद्यापीठाच्या नेतृत्व विकास शिबिराचा समारोप
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग, सेंटर फॉर लीडरशिप डेव्हलपमेंट आणि बहाई अकॅडमी, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय ;18 ते 22 जानेवारी 2026ध्द नेतृत्व विकास शिबिराचा काल समारोप झाला. या शिबिराच्या समारोपप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
समारोप भाषणात डॉ. शिंदे यांनी, युवकांवरील जबाबदा-या, समाजघडणीत युवक नेतृत्वाची भूमिका तसेच आदर्श युवक नेत्यांचे गुणधर्म यावर सखोल मार्गदर्शन केले. नेतृत्व म्हणजे केवळ पद नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी, मूल्यनिष्ठा आणि निर्णयक्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बहाई अकॅडमीचे संचालक लेसन आझादी यांनी मूल्याधिष्ठित नेतृत्वाची आवश्यकता विषद केली. यावेळी अमेरिकेतील अर्थशास्त्राचे प्राध्यापक जेम्स वेस्ट यांनी आंतरराष्ट्रीय एकात्मतेच्या गरजेविषयी सांगितले.
विद्यार्थी विकास संचालक डॉ. टी. एम. चौगुले यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. नेत्त्व विकास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. प्रल्हाद माने यांनी आभार मानले. शिबिराच्या कालावधीत नेत्त्व कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित नेतृत्त्व यावर विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात एकूण 70 विद्यार्थी सहभागी झाले. सहभागी विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून नेतृत्त्वविषयक नवे दृष्टिकोन मिळाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे सुरेखा आडके आणि विजय इंगवले, बहाई अकॅडमीचे पराग, प्रीती, मारूती कांबळे, चव्हाण, अल्पेश उपस्थित होते.