SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ऊसतोड मजूर आणि साखर कारखाने दोघांनाही मिळणार न्याय; खा. धनंजय महाडिक यांनी सुचवला सुवर्णमध्य!‘गोकुळ’ची दमदार प्रगती ठेवी ६०४ कोटीवर ; दूध संकलन २५ लाख लिटरचे उद्दिष्ट : नामदार हसन मुश्रीफशेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची : न्या.अभय आहुजाकोल्हापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादात कंदमूळ महोत्सवाचा समारोपगॅसचा जिल्ह्यात पुरेसा साठा; नागरिकांनी आवश्यकतेनुसारच सिलेंडर बुकिंग करावे : पालकमंत्री१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस​"सरकारी नोकरी सोडून समाजक्रांतीचा ध्यास घेणारे: मान्यवर काशिराम!"कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाहीभाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची दिल्ली विद्यापीठाला भेट, महाविद्यालयीन निवडणुकीची कार्यपद्धती घेतली जाणूनप्रा. वसिफा कोतवाल यांना डॉक्टरेट

जाहिरात

 

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला सुवर्णपदक

schedule28 Jan 26 person by visibility 297 categoryक्रीडा

कोल्हापूर : पंजाब युनिव्हर्सिटी, चंदिगड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा वेटलिफ्टिंग खेळाडू यश खंडागळे यांनी 71 किलो वजनी गटात स्नॅच 134 व क्लीन अँड जर्क 160 असे एकूण 294 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. तसेच, महिलांच्या 58 किलो वजनी गटात  निकिता कमलाकर हिने एकूण 181 किलो वजन उचलून सहावा क्रमांक मिळवला. या दोघांची निवड खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेसाठी झाली. 

संघ व्यवस्थापक म्हणून देवचंद महाविद्यालयाचे डॉ. रवींद्र चव्हाण व प्रशिक्षक म्हणून  शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

 विजेत्या खेळाडूंचे शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी व प्रभारी प्र -कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि क्रीडा संचालक प्रा.डॉ. शरद बनसोडे यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes