कोल्हापुरात आंदोलन : `ईव्हीएम हटाव देश बचाव`ला उत्स्फूर्त प्रतिसाद; विधानसभा निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी; महिलांचा लक्षणीय सहभाग
schedule30 Nov 24 person by visibility 706 categoryराजकीय
कोल्हापूर : `ईव्हीएम हटाव देश बचाव`च्या मागणीला आज कोल्हापुरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून येथील आम्ही भारतीयच्या वतीने पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी ॲड. बाबा इंदूलकर, कॉ. चंद्रकांत यादव, राष्ट्र सेवा दलाचे भरत लाटकर, भारतीताई पवार, सरलाताई पाटील, राजेश लाटकर यांनी मार्गदर्शन करताना ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या निवडणुकीतील खोटेपणा उघड केला. सर्वांनीच विधानसभा बरखास्त करून पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी यावेळी केली. जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, ईव्हीएम मुर्दा बाद, मुर्दा बाद, घाबरताय काय, उत्तर द्या, अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, संचालक मारुती जाधव, हिंदुराव चौगले, के. बी. पाटील, ए. डी. चौगले, धीरज डोंगळे, भरत रसाळे, प्रा. सुभाष जाधव, पंडित कंदले, दलित मित्र व्यंकाप्पा भोसले, रघुनाथ कांबळे, शिवाजीराव परुळेकर, शफिक देसाई, हरिश मालपाणी, अशोक जाधव, सौ. टिना कांबळे, सौ. चंदा बेलेकर, सौ. अनिता गवळी, सौ. विद्या निंबाळकर, सौ. वैशाली जाधव, बाजार समिती उपसभापती अमित कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.