+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule29 Jun 24 person by visibility 324 categoryक्रीडा
नवी दिल्ली : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून T20 World Cup चॅम्पियन बनवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या, त्यानंतर आफ्रिकेला 20 षटकांत केवळ 169 धावांवर रोखून सामना जिंकला. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला आहे. हा संघ  विश्वचषक T20  चॅम्पियन बनवला आहे.या विजयामुळे 140 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याची सुवर्णसंधी मिळाली.

 दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात 16 धावा करायच्या होत्या. मात्र आफ्रिकेला केवळ 8 धावा करता आल्या. हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले, ज्यामध्ये त्याने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद केले आणि भारताचा विजय निश्चित केला.

दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. डी कॉकने 31 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावांची खेळी केली. स्टब्सने २१ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावांची खेळी केली.

भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 3 षटकात 20 धावा देऊन तीन बळी घेतले, तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेतले. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.