केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कोणतीच घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय : आमदार जयश्री जाधव
schedule23 Jul 24 person by visibility 743 categoryविदेश
कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. अशी टीका आमदार जयश्री जाधव यांनी केले आहे.
महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प पंतप्रधानानी केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर देशातील मोठ्या महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप खासदारांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळत आहे. असे आमदार जयश्री जाधव यांनी म्हटले आहे.