SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

ऑनलाईन जर्नालिझम, फोटोग्राफी, शॉर्टफिल्म मेकिंग कोर्सला विद्यापीठात प्रवेश सुरु

schedule16 Jun 25 person by visibility 406 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात सुरु असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम, सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेन्ट्री फोटोग्राफी आणि सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग या तिन्हीही अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे तिन्हीही अभ्यासक्रम पार्ट टाईम आहेत. इतर कोणताही पूर्णवेळ अभ्यासक्रम शिकत असताना किंवा नोकरी आणि व्यवसाय करतही हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. विद्यापीठात फक्त शनिवार आणि रविवारी या कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते. या तिन्हीही कोर्ससाठी वयाची कोणतीही अट नाही. पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम हा पदवीनंतरचा एक वर्षाचा कोर्स आहे. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेन्ट्री फोटोग्राफी आणि सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग हे दोन्ही कोर्स तीन महिने कालावधीचे असून ते बारावी पास असणार्‍या कोणालाही करता येतात.

या तिन्हीही अभ्यासक्रमासाठी अध्यासनात स्टुडिओ, विविध सॉफ्टवेअर्स, संगणक लॅब, कॅमेरे यासह अन्य सर्व सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी https://sukapps.unishivaji.ac.in/pgentrance/#/login या लिंकवर कागदपत्रे अपलोड करुन नोंदणी करावी. या तिन्हीही कोर्सबाबत अधिक तपशील हवा असल्यास विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात विद्यार्थ्यांनी सपंर्क करावा, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes