+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustनियमित योग साधनेतून वैश्विक ऊर्जा प्राप्त : कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के adjustअन्न प्रक्रिया उद्योगातील नोंदणीकृत वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रशिक्षण adjustसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' उत्साहात adjustकोल्हापूर महानगरपालिका : 6 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरु adjustशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त के.एम.टी. उपक्रमामार्फत "ऐतिहासिक वास्तू दर्शन" सहलीसाठी विशेष बससेवा adjustचप्पल लाईन येथील विद्युत सेवावाहिनी शिफ्टिंगचे काम सुरु; 'आप'च्या मध्यस्तीस यश adjustशिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावासाठी 35 लाखाची तरतूद करा : आमदार जयश्री जाधव; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली सूचना adjust'गोकुळ’ मध्ये योग दिन उत्साहात साजरा... adjustज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हास्तरीय समितीचे काम महत्त्वपूर्ण : सहायक आयुक्त सचिन साळे adjustराधानगरी धरणात 2.19 टीएमसी पाणीसाठा; तर जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणी पातळी...
SMP_news_Gokul_ghee
schedule20 May 24 person by visibility 586 categoryआरोग्य
कोल्हापूर : आमदार पी.एन.पाटील यांच्यावर काल तातडीने शस्त्रक्रिया केल्यानंतर आज त्यांची प्रकृती सुधारत आहे . सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले आहे.

दरम्यान आज सोमवारी आमदार पी. एन. पाटील यांचे कार्यकर्ते तसेच विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली .जनतेचा पांडुरंग लवकरात लवकर बरा होईल अशी आशा व्यक्त करत कार्यकर्त्यांनी आ.पाटील लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

आज दिवसभरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार ऋतुराज पाटील ,आमदार जयश्री जाधव, ,सांगलीचे विशाल पाटील, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे,समरजित घाटगे यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलला भेट देत राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याशी चर्चा करून आमदार पी एन पाटील यांच्या तब्येती बाबत माहिती घेतली.

दरम्यान ,डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी काल रविवारी हॉस्पिटलमध्ये येऊन पी एन पाटील यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

परदेशात असलेले आमदार सतेज पाटील हे आ.पी.एन.पाटील यांना ऍडमिट केल्यापासून सातत्याने राजेश पाटील यांच्या संपर्कात आहेत. तसेच डॉ. बराले, डॉ.संदीप पाटील यांच्यासह हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी त्यांचे नियमित फोनवरून बोलणे सुरू आहे.

आमदार ऋतुराज पाटील हे पी. एन. पाटील यांना काल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. सुहास बराले यांना मुंबईतून कोल्हापूर आणण्यासाठी खास विमानाची व्यवस्था केली. 

कालपासून आ.पाटील हे राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्या सतत संपर्कात आहेत. आज सोमवारी हॉस्पिटल मध्ये येऊन त्यांनी पाटील बंधू आणि कार्यकर्त्याशी चर्चा केली. डॉ. संदीप पाटील यांच्यासोबत आ.ऋतुराज पाटील यांनी अतिदक्षता विभागात जाऊन आ.पी.एन. पाटील यांच्या प्रकृतीची पाहणी करून डॉक्टरांकडून बराच वेळ माहिती घेतली. 
यावेळी हॉस्पिटल परिसरात गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले ,शारंगधर देशमुख, मधुकर रामाने,माँटी मगदूम, अशपाक आजरेकर, प्राचार्य डॉ.महादेव नरके, रोहित गवळी, हेमंत उलपे हे आ.पाटील यांच्यासोबत उपस्थित होते.