SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन पीक विविधतेतून उत्पन्नवाढ शक्य : डॉ. गणेश कदम: डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शनशिवाजी विद्यापीठात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणस्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमामुळे कोल्हापूर औद्योगिक क्षेत्रात 'क्लीन अँड ग्रीन'चा आदर्श : जिल्हाधिकारी अमोल येडगेमहिला संरक्षणाला विशेष प्राधान्य, अपर पोलिस अधीक्षक धिरजकुमार बच्चू यांचे प्रतिपादनईदनिमित्त कुर्बानीसाठी कत्तलखान्यात व्यवस्थाडी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरालिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण : समीक्षाचा खून, सतीश यादवची आत्महत्यासंजय घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थी प्रणव भोपळे याचे चौथे वर्ल्ड रेकॉर्ड!सैनिकी मुला, मुलींच्या वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पद भरती

जाहिरात

 

लिव्ह इन रिलेशिनशिपमधील वादातून सरनोबतवाडीमध्ये युवतीचा खून

schedule03 Jun 25 person by visibility 337 categoryगुन्हे

कोल्हापूर  : लिव्ह इन रिलेशिनशिपमधील वादातून सरनोबतवाडीमध्ये कसबा बावडा (ता. करवीर) येथील युवतीचा खून झाला. समीक्षा उर्फ आर्या भारत नरसिंगे बागडी असे या युवतीचे  नाव आहे. संशयीत आरोपी सतीश यादवने समिक्षा नरसिंगेची चाकून भोकसून खून केला असून फरारी आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

कसबा बावडा येथील समिक्षाचा कोल्हापुरातील एका तरूणाबरोबर विवाह झाला होता. त्यानंतर त्यांच्यात वितुष्ट आलं. बी ए चं शिक्षण पूर्ण करून, समिक्षानं इव्हेंटमॅनेजमेंटचं काम करण्यास सुरवात केली. काही महिन्यापूर्वी तिची ओळख सतीश यादव  याच्याशी झाली होती. ते दोघेजण लिव्ह इन रिलेशिनशिप मध्ये राहत होते.

गेल्या काही दिवसांपासून समिक्षा आणि सतीश यांच्यामध्ये खटके उडू लागले. त्यामुळं वैतागून समिक्षा आणि तिची मैत्रिण आयषु या दोघी कसबा बावड्यातील आईच्या घरी राहत होत्या. गेल्या तीन दिवसांपासून सत्तीश यादव आयषु हिला वारंवार फोन करून समिक्षाला भेटायचं असल्याचं सांगत होता. आज दुपारी एक वाजता समिक्षा आणि आयषु दुचाकीवरून सरनोबतवाडी इथल्या फ्लॅटवर गेल्या. तिथं सतीश यादव आला. रागात असलेल्या सतीश यादवनं अचानक त्याच्याकडील चाकूनं समिक्षावर हल्ला केला. त्याला रोखण्यासाठी आयषुनं प्रयत्न केला. मात्र तिच्याही हाताला जखम झाली. अशातच सतीशनं समिक्षाच्या छातीमध्ये भोकसल्यानं ती जमिनीवर कोसळली. 

 सीपीआर मध्ये समिक्षाला दाखल केलं. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes