SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : गोखले कॉलेज ते मंगेशकर नगर परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाईफिटनेससोबत आरोग्य आणि मनोरंजनाचा संगम; रग्डियन ठरतंय कोल्हापुरकरांचं फिटनेस डेस्टिनेशन!माधुरी हत्ती गुजरातमधून नांदणीकडे रवाना : आमदार यड्रावकरकोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत अवैध मावा कारखान्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांचा छापा; २.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण ताब्यातकोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केटमधील थकबाकी असलेले 13 गाळे सीलकोल्हापूर : प्रभाग क्र. ४ मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी, २० कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान टोलमाफीसण-उत्सवांतील मंडप तपासणीसाठी दोन संनियंत्रण समित्या कोल्हापुरात प्रशासनाची धडक मोहीम: राजारामपुरी व लक्ष्मीपुरी परिसरातील रस्ते अडविणारी ४३ चार चाकी बेवारस वाहने हटविली! मनुष्यजीवनाला मोल आहे! 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त' आत्मपरीक्षण आणि जनजागृतीची नितांत गरज

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धा सन 2023

schedule03 Mar 23 person by visibility 2784 categoryक्रीडा

 
कोल्हापूर  : लोकराजा राजर्षि  छत्रपती  शाहूंच्या  राजाश्रयाने  कोल्हापूर क्रिडा परंपरेचा पाया मजबूत झाला. भावी पिढी निर्व्यसनी, सक्षम, आरोग्यदायी घडविणेसाठी आणि प्राचीन कुस्तीच्या जतन संवर्धनाच्या उद्देशाने राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरात तालीम पंरपरा सुरू केली. तसेच विविध क्रिडा प्रकारांना प्रोत्साहन 
दिले.
            कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धा सन 2023 दिनांक 6 ते 19 मार्च 2023 या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथे भरविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील  14 नामांकित संघसहभाग असणार आहे. सदर स्पर्ध्येतून कोल्हापूर स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान   तसेच  इतर  शासकीय  योजनाचा प्रसार करणेत येणार आहे.
            विजयी संघास रु.1 लाख 50 हजार व चषक, उपविजेत्या संघास 75 हजार व चषक असे बक्षीसाचे स्वरुप असणार आहे. याशिवाय उत्कृष्ठ गोलकिपर, उत्कृष्ठ डिफेन्स, उत्कृष्ठ हाफ, उत्कृष्ठ फॉरवर्ड खेळाडूस प्रत्येक रुपये 10,000/- व चषक व संपुर्ण स्पर्धेतील उत्कृष्ठ खेळाडूस रुपये 20,000/- व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. व स्पर्धेतील पहिल्या फेरीत बाद होणाऱ्या आठ संघास प्रत्येकी रुपये 5,000/- व दुसऱ्या फेरीत बाद होणाऱ्या संघास प्रत्येकी रुपये 10,000/- देणेत येणार आहे. उपांत्य सामना पराभूत दोन्ही संघास रु. 20 हजार बक्षीस देण्यात येणार आहे.
सर्व फुटबॉल स्पर्धा या  बाद  पध्दतीने  खेळविण्यात  येणार  आहेत. 

कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशन व कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन यांचे नियमानुसारच स्पर्धा पार पडतील.
 फुटबॉल  स्पर्धे  ठिकाणी  सिक्युरिटीसाठी  महापालिकेच्या  अग्निशमन विभागाकडील कर्मचारी, प्रथमोपचार व्यवस्थेसाठी महापालिका आरोग्य विभागाकडील ऍ़म्ब्युलन्स व फिजोओथेरपीस्ट उपलब्ध असतील. तसेच कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन मार्फत क्लोज सर्किट कॅमेरा सुविधा पुरविल्या जाणार आहे.

तरी जास्तीत जास्त फूटबॉल प्रेमी यांनी स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करणेत येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes