SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सारंग देशमुख यांच्या सोबतीने महायुती मजबूत : चंद्रकांतदादा पाटीलखासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारककर्करुग्णांसाठी मोठा दिलासा विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेशपदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्ककौशल्यातूनच जागतिक नेतृत्व शक्य : प्रा. डॉ. भीमराया मेत्री३१ ऑक्टोबरपर्यंत थकीत मुद्दल न भरल्यास ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित करणारगरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस: कारण, महत्त्व आणि संकल्पप्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.3 राजारामपुरी व केंद्र क्रं.4 पंचगंगा या आरोग्य संस्था गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय मानांकनास पात्रकोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘फ्युचर रेडी इंजिनिअर ’ कार्यक्रमाचा समारोप'गोकुळ' निवडणुकीत विश्वासाचा घात; महायुतीचे नेते स्वतःच्याच कार्यकर्त्यांवर अविश्वासी : आ. सतेज पाटील यांचा घणाघात

जाहिरात

 

ताराबाई गार्डनमध्ये सुविधा द्या : 'आप'ची मागणी

schedule11 Dec 24 person by visibility 749 categoryमहानगरपालिका

 कोल्हापूर  : ताराबाई गार्डन हे शहरातील प्रमुख उद्यानांपैकी एक आहे. परिसरातील अनेक लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, तसेच पर्यटक या उद्यानात वॉकिंग, खेळ, योग करण्यास तसेच विसावा घेण्यास येतात. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या उद्यानाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून येथील सोईसुविधा वाढवाव्यात अशी मागणी आम आदमी पार्टीने उपायुक्त साधना पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

ताराबाई गार्डन येथे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत लँडस्केपींग करण्यात येणार आहे. हे लँडस्केप प्रशस्त लॉन असलेल्या खुल्या जागेमध्ये आहे. केलेले डिझाईन मुलांना खेळण्यासाठी अडचण करणारे आहे. तसेच येथे भरणाऱ्या योग वर्गास देखील जागे अभावी याची अडचण होणार आहे. तरी याच बजेट मधून गार्डन मध्ये उच्च प्रतिची देशी झाडे तसेच फुलांची झाडे वापरून सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली.

यासोबतच कर्मचारी कमी असल्याने झाडांना वेळेवर पाणी घालणे शक्य होत नाही. यासाठी उद्यान विभागात भरती करावी, लहान मुलांना ट्रॅफिक नियमांची ओळख व्हावी यासाठी उद्यानात ट्रॅफिक लाईट द्वारे सिग्नल सिस्टम लावण्यात आली आहे. परंतु गेले दोन वर्षे ही सिस्टीम बंद असून ती त्वरित सुरु करण्यात यावी. तसेच सिग्नलचे प्रशिक्षण देण्यासाठी आरटीओ सोबत मिळून महिन्यातून काही ठराविक दिवस येथे वाहतूक प्रशिक्षण नियम शिकवण्यात यावेत, उद्यानातील झाडांचे नामकरण (साइन्टिफिक आणि जेनेरिक नावे) करणाऱ्या पाट्या उपलब्ध पुन्हा लावण्यात याव्यात, उद्यानाच्या कट्ट्यावर बसून मद्यपान करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा. 

उद्यानातील खेळणी खराब झाली आहेत. खेळणी बदलण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे, त्याची प्रक्रिया जलद करून चांगली, टिकाऊ व वापरा योग्य खेळणी बसवण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली.

यावेळी ताराबाई गार्डन परिवार ग्रुपचे कार्यवाहक संजय घाटगे (वंदूरकर), आप सचिव समीर लतीफ, प्रतीक माने आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes