SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाहीभाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची दिल्ली विद्यापीठाला भेट, महाविद्यालयीन निवडणुकीची कार्यपद्धती घेतली जाणूनप्रा. वसिफा कोतवाल यांना डॉक्टरेट ​"६३ वर्षांची उज्ज्वल परंपरा अन् नवी झेप! गोकुळच्या वर्धापन दिनानिमित्त 'गोकुळ आईस्क्रीम' लाँच आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन"'पालकत्वाचा लढा होईल सोपा; पद्माराजे हायस्कूलचा मदतीचा हात!'स्वच्छ कोल्हापूरसाठी महापालिका सरसावली; सुभाषनगर आणि वर्षानगर परिसरात राबवली धडक स्वच्छता मोहीम!वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनवरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उद्ध्वस्त; शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, सिलिंडरचा साठा जप्त!धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजेव्हा भारतीय पडदा पहिल्यांदा बोलू लागला...

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात एनर्जी स्वराज यात्रेचे स्वागत

schedule17 Nov 25 person by visibility 329 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे 'सोलर मॅन ऑफ इंडिया' या नावाने ओळखले जाणारे आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. चेतन सिंग सोळंकी यांच्या 'एनर्जी स्वराज' यात्रेचे स्वागत करण्यात आले.

 

 डॉ. सोळंकी यांनी आपल्या आयआयटी, मुंबई येथील प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन आपले जीवन पूर्णपणे एनर्जी स्वराज यात्रेला समर्पित केले आहे. डॉ. सोळंकी यांनी खास सौर ऊर्जा बस तयार केली असून, सौरचलित विविध उपकरणे वापरुन तसेच ह्याच बसमध्ये राहून पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने स्वच्छ आणि नविकरणीय ऊर्जेचे महत्त्व पूर्ण भारत देशामध्ये प्रसार करीत आहेत. त्यांनी या यात्रेची सुरुवात २०२० मध्ये केली असून ते २०३० पर्यंत या यात्रेमध्ये सहभागी होऊन घरी न परतण्याचा निर्धार केलेला आहे. त्यांनी ५ वर्षात आतापर्यंत ६५,००० किलोमीटर एवढे अंतर पूर्ण केले आहे. 

या यात्रेमधील सौर चलित बसचा अनुभव घेण्यासाठी शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन, पदवी, पदव्युत्तर, तसेच संशोधक विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

 या उपक्रमात भौतिकशास्त्र अधिविभागासह इतर अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. 

या एनर्जी स्वराज यात्रेचे  भौतिकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रा. आर. जी. सोनकवडे, डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. ए. व्ही. मोहोळकर, डॉ. आर. एस. व्हटकर, संयोजक डॉ. एन. एल. तरवाळ, डॉ. व्ही. एस. कुंभार, डॉ. सी. बा. दास, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. ए. आर. पाटील, डॉ. एम. आर. वायकर, डॉ. एस. जे. शिंदे आणि संशोधक विद्यार्थी यांनी स्वागत केले. संयोजक डॉ. एन. एल. तरवाळ यांनी 'एनर्जी स्वराज' या संकल्पनेमागील भूमिका स्पष्ट केली आणि सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी सर्वांना आवाहन केले.  विद्यापीठ प्रशासनानेही या यात्रेच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes