SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चारा लागवडीतून ग्रामीण रोजगाराला चालना; पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेपाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढतरुणांनी अमली पदार्थमुक्त भारताचे राजदूत बनावे; जनजागृती, प्रतिबंध आणि पुनर्वसनावर भर द्यावा : राज्यपाल जिष्णु देव वर्माडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार राजापूर–राजापूरवाडी रस्त्यासाठी आमदार यड्रावकर यांचा ५० लाखांचा निधी मंजूरघालवाड येथील आरोग्य शिबिरात ३८६ नागरिकांची तपासणीसंयुक्त राष्ट्र दिन: जागतिक शांतता आणि एकात्मतेचे प्रतीक पार्श्वभूमी आणि स्थापनापुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक: कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदपरीक्षा अर्जासाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलसिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रण

जाहिरात

 

शनि शिंगणापूर गावात चोरी : श्रद्धेवरच प्रश्नचिन्ह?

schedule16 Jul 25 person by visibility 751 categoryराज्य

✍️ डाॅ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर

पंचवीस तीस वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर हिंदी भाषेतील 'सुरभी' या मालिकेने घराघरात लोकप्रियता मिळवली होती. देशभरातील वैशिष्ट्यपूर्ण घटना,काही प्रसंग व अविश्वास बसणार नाही अशा वास्तव गोष्टींची माहिती रंजक पद्धतीने दिली जात होती, आज या 'सुरभी' मालिकेची आठवण ताजी झाली, यांचं कारण असं की, त्याच कार्यक्रमात शनी शिंगणापूर गावात शनीदेवावर ग्रामस्थांची प्रचंड श्रद्धा असून शनी कृपेने इथघरांना दरवाजे व कडी कोयंडे कुलुपे नसतांनाही इथे कसल्याही प्रकारची चोरी होत नाही, ही आश्चर्याची गोष्ट या छोट्या पडद्यावर दाखवली गेली, आणि संपूर्ण महाराष्ट्रासह इतर प्रांतातील शनी भक्तांची प्रचंड गर्दी या गावात होऊ लागली.

 अनेकांनी या नवलयुक्त आश्चर्यचकित करणाऱ्या गावांसंबंधी प्रसारमाध्यमांनी प्रचंड प्रसिद्धी ही दिली.शालेय विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाच्या चाचणी परीक्षेत "महाराष्ट्रातील कुठल्या गावात एकाही घराला कडी-कोयंडा नाही?" हा हमखास प्रश्न विचारला जाऊं लागला . अर्थात त्याचे उत्तर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिदेवाचे जागृत देवस्थान असलेले शनि शिंगणापुर हे गाव.  या गावात शनिदेवाचे अस्तित्व असल्याने येथे चोरी होत नाही, त्यामुळे घरांना कडी कोयंडा लावण्याची गरज भासत नाही असे मानले जाते. मात्र या श्रद्धेला तडा जाणारी चोरीची घटना नुकतीच या शनि शिंगणापूर गावात उघडकीस आली आहे. 

या गावातील शनि मंदिराचे कामकाज पाहणाऱ्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी आणि अधिकान्यांनी शनि देवाची भीती न बाळगता अंदाजे ५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा केला असल्याचे उघडकीस आले आहे. धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालातून ही गोष्ट समोर आली आहे. देवस्थानच्या विश्वस्तांनी बनावट मोबाईल ॲपद्वारे पूजा आणि देणग्यांच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळलेच पण देवस्थानात २५० च्या आसपास कर्मचारी कार्यरत असताना कागदोपत्री २४४७ कर्मचारी दाखवून कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे.

ज्या शनि शिंगणापूर गावात चोरी होत नाही म्हणून गावातील घरांना कड़ी कोयंडे लावले जात नाहीत असे गर्वाने व अभिमानाने सांगितले जाते, त्यांच गावातील शनिदेवाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे कोट्यवधी रुपये लुटणाऱ्या या महाचोरांमुळे शनि शिंगणापूर गावात चोरी होत नाही या श्रद्धेलान तडा गेला असून इथल्या गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या श्रध्दा,भक्तीभाव  आणि परंपरेवरच एक प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes