SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय कलाकार दिन: कलेच्या आणि सर्जनशीलतेचा उत्सवचारा लागवडीतून ग्रामीण रोजगाराला चालना; पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेपाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढतरुणांनी अमली पदार्थमुक्त भारताचे राजदूत बनावे; जनजागृती, प्रतिबंध आणि पुनर्वसनावर भर द्यावा : राज्यपाल जिष्णु देव वर्माडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार राजापूर–राजापूरवाडी रस्त्यासाठी आमदार यड्रावकर यांचा ५० लाखांचा निधी मंजूरघालवाड येथील आरोग्य शिबिरात ३८६ नागरिकांची तपासणीसंयुक्त राष्ट्र दिन: जागतिक शांतता आणि एकात्मतेचे प्रतीक पार्श्वभूमी आणि स्थापनापुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक: कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदपरीक्षा अर्जासाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

जाहिरात

 

केआयटीच्या विश्व तांबेचे आशियाई पॅरा युथ गेम्समध्ये घवघवीत यश; दोन रजत पथकांची कमाई करत राष्ट्रीय मानांकन यादीत अव्वल

schedule27 Dec 25 person by visibility 487 categoryक्रीडा

कोल्हापूर  : येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी विश्व तांबे याने दि.१० ते १२  डिसेंबर रोजी दुबई येथे संपन्न झालेल्या आशियाई पॅरा युथ गेम्स मध्ये यशस्वी सहभाग नोंदवला.

टेबल टेनिस या खेळामध्ये त्याने पुरुष एकेरी क्लास १० मध्ये व मिक्स डबल क्लास २० मध्ये दोन रजत पदकांची कमाई केली. आज विश्व ताम्बेने वर्ल्ड रँक ४४ , यु.२३ वर्ल्ड रँक -१३ आणि राष्ट्रीय स्तरावरील मानांकन यादीमध्ये प्रथम मानांकनला गवसणी घातलेली आहे.केआयटीने महाविद्यालयात विद्यार्थ्यांमधील खेळ संस्कृतीला नेहमीच बळ दिले आहे.गेल्या २-३ वर्षात असे ५-६ विद्यार्थी खेळाडू आहेत ज्यांनी केआयटीच्या आर्थिक सहकार्याने व प्रोत्साहनाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे.

भविष्यातही क्षमतावान खेळाडूंना सर्वप्रकारचे सहकार्य केआयटी करेल असा विश्वास मा.संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केला.

संस्थेचे सचिव  दीपक चौगुले, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी त्याचे आज विशेष अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली ,उपाध्यक्ष  सचिन मेनन अन्य  विश्वस्त यांचे त्याला प्रोत्साहन लाभले. मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. उदय भापकर,महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.विजय रोकडे यांचे मोठे सहकार्य त्याला लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes