हॉटेल व्यवसायिकास दारू विक्रीचा परवाना देण्याचे आमिष : एक कोटी पाच लाख रुपयाची फसवणुक; अपर पोलीस अधीक्षकास अटक
schedule08 Sep 24 person by visibility 429 categoryगुन्हे
पुणे : दारू विक्रीचा परवाना देतो असे सांगुन एक कोटी पाच लाख रुपयाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे नेमणुकीस असलेले अपर पोलीस अधीक्षक, श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे यास अटक करण्यात आली.
महाबळेश्वर येथील मेघदुत हॉटेलचे मालक यांना मद्य विक्री परवाना मिळवून देतो असे सांगुन आरोपी श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे याचे मित्र हानुमंत मुंढे व इतर साथीदारांच्या मदतीने हॉटेल मालक यांचा विश्वास संपादन करून दोन कोटी पन्नास लाख रुपये खर्च येणार असे सांगितले व त्यांचेकडून एक कोटी पाच लाख रुपये रोखीने व चेकव्दारे घेवुन हॉटेल मालक याची फसवणुक केली आहे.
हॉटेल मालक यांनी आपली फसवणुक झालेचे लक्षात येताच त्यांनी मा. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे तक्रारी अर्ज केला होता.
सदर अर्जाची चौकशी आर्थीक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी करून गुन्ह्याचे स्वरुप निष्पन्न झालेने वर नमुद प्रमाणे वाई पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
यापुर्वी नमुद गुन्ह्यातील आरोपी हानुमंत विष्णुदास मुंडे, अभिमन्यु रामदास देडगे व बाळु बाबासाहेब पुरी यांना अटक करून कार्यवाही केली आहे.
या गुन्ह्याच्या तपासकामी प्रशांत बुरडे अपर पोलीस महासंचालक व बसवराज तेली पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्रीमती मनिषा दुबुले, कोल्हापुर परिक्षेत्र, या तपास करत आहेत.
या गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळी पथके कार्यरत होती यामध्ये गणेश माळी, पोलीस उपअधीक्षक, श्रीमती वर्षा कावडे, पोलीस निरीक्षक, विजय कुभांर, निवृत्ती पाडेकर पोलीस अंमलदार, चालक जमीर मुल्ला व स्वप्नील जाधव यांनी आरोपी श्रीकांत कोल्हापूरे यास नाशिक - मुंबई, खटवली टोलनाका, ठाणे येथे ताब्यात घेतले.
या गुन्ह्यातील आरोपी श्रीकांत कोल्हापूर यास अटक करून वाई न्यायालय येथे हजर केले असता त्यास ५ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.