महाकुंभ 2025 : किन्नर आखाड्याने केले अमृत स्नान, भक्तिमय वातावरणामध्ये भाविकांकडून पवित्र स्नान सुरु...
schedule14 Jan 25 person by visibility 324 categoryदेश
नवी दिल्ली : प्रयागराज येथे महाकुंभ सुरू झाला आहे. कडाक्याच्या थंडीची चिंता न करता देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक स्नान करण्यासाठी संगमात पोहोचत आहेत. परदेशी भाविकही महाकुंभात पोहोचत आहेत.
प्रयागराजमध्ये मकर संक्रांतीनिमित्त अमृत स्नानात सहभागी होणाऱ्या भाविकांवर हेलिकॅप्टर मधून पुष्पवृष्टी केली जात आहे. भक्ती आणि संस्कृतीचा संगम असलेल्या महाकुंभमेळा २०२५ मध्ये देशभरातून भाविक जमले आहेत. भाविक भजन गात आहेत आणि नाचत आहेत.
किन्नर आखाड्यातील संतांनी अमृत स्नान केले. किन्नर आखाड्याचे संत रथावर स्वार होऊन संगम तीरावर पोहोचले. किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी म्हणाले की, "आज आपण संगम तीर्थावर आहोत. महाकुंभ २०२५ चा हा पहिला अमृत स्नान आहे आणि आम्हाला अमृत स्नानात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आनंद आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा."