नवजीवन'च्या सुवर्णप्राशन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule14 Jan 25 person by visibility 414 categoryआरोग्य
कोल्हापूर : प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर सुवर्ण प्राशन करणे हे मुलांच्या आरोग्यासाठी शुभ मानले जाते. सुवर्ण प्राशन ही एक प्राचीन आयुर्वेदिक पद्धत आहे. यात सोन्याची राख, औषधी वनस्पती, मध आणि तूप यांचे मिश्रण दिले जाते. डॉ अनिकेत रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात जवळपास 250 पेक्षा जास्त बालकांना सुवर्ण प्राशन डोस देण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ अनिकेत यांनी सांगितले की, सुवर्ण प्राशन केल्याने मुलांची प्रतिकारशक्ती वाढते, स्मरणशक्ती सुधारते, पचनास मदत होते, शारीरिक आणि मानसिक विकास वाढतो, संज्ञानात्मक क्षमता वाढते. पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी एक सर्वात शुभ नक्षत्र मानले जाते. पुष्य नक्षत्र हे सोन्याचे नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्रात सुवर्ण प्राशन केल्याने त्याचे फायदे वाढतात. स्वर्ण प्राशन किमान सहा महिने तरी करणे आवश्यक आहे.
सकाळी लवकर रिकाम्या पोटी प्राशन करणे योग्य आहे. परंतु ते अत्यंत शोषक आणि जैव उपलब्ध करण्यासाठी घटकांवर प्रक्रिया केली जात असल्याने, ते दिवसाच्या उत्तरार्धात देखील दिले जाऊ शकते.
ते पुढे म्हणाले, सुवर्णप्राशन हे आयुर्वेदिक औषध आहे. यामुळे मुलांची रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि ते निरोगी राहतात. सुवर्णप्राशन घेतल्याने मुलांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढते. सुवर्णप्राशन घेतल्याने मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
* सुवर्णप्राशन घेतल्याने मुलांची शारीरिक शक्ती वाढते.
* सुवर्णप्राशन घेतल्याने मुलांची सहनशक्ती सुधारते.
* सुवर्णप्राशन घेतल्याने मुलांची बौद्धिक क्षमता, आकलन शक्ती, विश्लेषण शक्ती आणि स्मरणशक्ती सुधारते.
* सुवर्णप्राशन घेतल्याने मुलांना वारंवार आजारी पडण्यापासून प्रतिबंध होतो.
या शिबिराचा शहर व परिसरातील शून्य ते सोळा वयोगटातील बालकांनी लाभ घेतला.