जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ वारणेत आणणार : एन. एच. पाटील; कोरे अभियांत्रिकीत प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
schedule31 Aug 26 person by visibility 106 categoryसामाजिक
वारणानगर : वारणा विद्यापीठ आणि तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील विद्यार्थ्यांसाठी जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ वारणेत आणले जातील. तसेच यावर्षीपासून शोभाताई कोरे ज्ञानशिष्यवृत्तीची रक्कम व लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती वारणा विद्यापीठाचे प्रॉव्होस्ट मा. एन. एच. पाटील यांनी दिली.
तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस), वारणानगर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अभियांत्रिकी, एमबीए व एमसीएच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘दीक्षारंभ’ विद्यार्थी ओरिएंटेशन व इंडक्शन प्रोग्रामच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी आनंदी राहून शिक्षण घेतले पाहिजे व पालकांनी जें-झी आणि अल्फा ची भाषा व वागणूक अवगत केली पाहिजे असेही ते म्हणाले. उद्घाटन प्रसंगी १६०० हून अधिक विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी विद्यार्थ्यांनी पुढील चार वर्षांत काय शिकायचे व पदवीनंतर काय साध्य करायचे याचे नियोजन करून तात्यासाहेब कोरे यांच्या स्वप्नातील सक्षम व जबाबदार व्यक्ती बनावे, असे आवाहन केले.
वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी महाविद्यालयातील परीक्षा पद्धती, इलेक्ट्रिकल वेहिकल लॅब (इव्ही), प्रशिक्षण कार्यक्रम तसेच नव्याने सुरू होणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे,कुलसचिव, विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगावी, मा. (डॉ.) प्रसाद बी. रामपुरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
विशेष उपस्थीत, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट (मार्केटिंग), घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि., कोल्हापूर, मा. श्री. फत्तेसिंग जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक व आरोग्यविषयक विकासाचे महत्त्व विविध उदाहरणांसह स्पष्ट केले.
प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. पी. जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांच्याबाबत माहिती पुरवली
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, डॉ. पी. व्ही. मुळीक, डीन अकॅडेमिक्स, एमबीए विभागप्रमुख प्रा. पी. एस. कडापूरे, एमसीए विभागप्रमुख डॉ. शिवलीला अरळिमट्टी, ऍडमिशन इन्चार्ज, डॉ. ए व्ही पाटील, प्रा . डी. एस. माने उपस्थित होते.
आभार प्रदर्शन व कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक डॉ. एस. एम. जाधव व डॉ. एस. बी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मार्क मोनिस, प्रा. गणेश कांबळे व प्रा. मिलिंद कामत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.