SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बांबवडे येथे 5 जून रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनकोल्हापुरी चपलेचा डंका सातासमुद्रापार! ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला तब्बल ११ जागतिक पुरस्कार; 'ब्लॅक एलिफंट'वरही कोरले नाव!२५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण ; कोल्हापूरमधील रुग्णसेवेला नवे बळकसबा बावडा परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाईजगाच्या कल्याणासाठी मनुष्याने शाश्वत जीवनशैली पुढे घेवून जाणे आवश्यक : सिध्दार्थ शिंदेडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘इंडिया एलिट एज्युकेशन अवॉर्ड’ ने सन्मानितप्रिन्सेस पद्माराजेच्या पूर्वा केंगलेची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवडजागतिक पचन आरोग्य दिन: निरोगी शरीराची सुरुवात होते मजबूत पचनसंस्थेपासून!तांबट कमान ते तलवार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाईकोल्हापुरात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक; १.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

कोल्हापुरी चपलेचा डंका सातासमुद्रापार! ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला तब्बल ११ जागतिक पुरस्कार; 'ब्लॅक एलिफंट'वरही कोरले नाव!

schedule29 May 26 person by visibility 105 categoryसामाजिक

कोल्हापूर : जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एक शानदार समारंभामध्ये कोल्हापूर मधील कलापुरी आणि व्हि.एम.एल. ह्या जागतिक मेडिया एजन्सीच्या संयुक्त प्रयत्नांनी निर्मिलेल्या “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकास एकूण ११   “क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स” प्राप्त झाले आहेत जाहीरात व क्रिएटीव्हिटीच्या क्षेत्रात क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स हा एक जागतिक स्तरावरचा सन्मान समजला जातो. “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकाने ११  पुरस्कार प्राप्त करून कोल्हापुरी चप्पल व कोल्हापूरचा नावलौकिक सातासमुद्रापार पोचवला.

 क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्समधील सर्वोच्च अवॉर्ड “ब्लॅक एलिफंट” हा पुरस्कार देखील कलापुरीने प्राप्त केला. असल्याची माहिती प्रा.श्रीधर वैद्य,संस्थापक कलापूरी  अपर्णा चव्हाण, आतीष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी पत्रकार परिषदेला अमृता काळे उपस्थित होत्या.

याची अधिक माहिती देताना चव्हाण यांनी सन्मान  कार्यक्रमास प्रसिध्द लेखक व प्रसारभारतीचे अध्यक्ष  प्रसून जोशी, क्युरियसचे राजेश केजरीवाल, व्हि.एम.एलच्या सि.ई.ओ. बबिता बरूआ, व्हि.एम.एलचे क्रिएटिव्ह ग्रुपचे प्रमुख कल्पेश पाटणकर व क्रिएटिव्ह मेडिया क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक गौरी शिंदे, हर्षद राजाध्यक्ष, राहुल मॅथ्यू ह्या सारख्या दिग्गजांनी ज्यूरी म्हणून काम पहिले.

 क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स व्यतिरिक्त “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकास तीन क्लिओ अवॉर्ड्स (कास्य पदक) प्राप्त झाली आहेत. १९५९ मध्ये स्थापन झालेले क्लियो अवॉर्ड्स हे जाहिरात, डिझाईन आणि संवाद क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी एक मापदंड आहेत. क्लियो अवॉर्ड्ससाठी दरवर्षी जगभरातील आघाडीच्या सर्जनशील व्यावसायिकांनी  सादर केलेल्या कामांचे मूल्यमापन केले जाते आणि उद्योगासाठी नवीन मानके प्रस्थापित करणाऱ्या कामाची क्लियो अवॉर्ड्ससाठी निवड होते. D&AD अवॉर्ड्स २०२६ साठी रायटिंग फॉर डिझाईनमध्ये श्रेणीमध्ये वुड पेन्सिल अवॉर्ड्ने सन्मानित करण्यात आले आहे. जागतिक पातळीवरील नामांकित अँबीज अवॉर्ड्समध्ये “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकास विविध प्रकारांमध्ये गोल्ड, सिल्व्हर व ब्रॉंझ पदक प्राप्त झाले आहे. त्याच प्रमाणे द वन शो यांनी देखील “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकास पुरस्कार देवून गौरविले आहे.

कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापूरच्या वैभवशाली कलासंस्कृतीचे प्रतीक आहे. कोल्हापूरमध्ये कारागिरांच्या अनेक पिढ्या अत्यंत बारकाईने व कुशलतेने कोल्हापुरी चपला हाताने बनवत आल्या आहेत. कोल्हापुरी चप्पल ही पारंपरिक कला, कौशल्य आणि अप्रतिम कारागिरीचे प्रतीक आहे. जागतिक फॅशन उद्योगाने अनेकदा कोल्हापुरी चप्पलच्या कौशल्यपूर्ण डिझाईनचे कौतुक केले आहे, परंतु त्याचे मूळ आणि त्यामागील लोकांकडे दुर्लक्ष केले आहे.

 पिढ्यानुपिढ्या कोल्हापुरी चप्पलची कला जोपासणाऱ्या कारागिराना त्यांच्या कलेचे श्रेय देण्याचे काम “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकाने केले आहे. मिलान फॅशन वीक २०२५ मध्ये, प्राडाने (Prada) कोल्हापुरी चपलांशी अगदी मिळत्याजुळत्या असलेल्या चपला त्यांच्या मूळ उत्पत्तीचे किंवा निर्मात्यांचे श्रेय न देता प्रदर्शित केल्या, ज्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली. याचा फक्त निषेध नोंदवण्याऐवजी कोल्हापुरी चप्पलसाठी जी. आय. मार्क प्राप्त असणाऱ्या 'कलापुरी'ने एक वेगळा मार्ग निवडला. कलापुरीने  'द कोल्हापुरी' (The Kolhapuri) हे हाताने बनवलेले पुस्तक तयार केले, ज्यामध्ये या कलेचा हजार वर्षांचा प्रवास आणि त्यामागील कारागिरांची माहिती दस्तऐवजीकृत केली आहे. 

   अपर्णा चव्हाण व  आतिश चव्हाण यांनी सुरु केलेल्या व केवळ हस्तकला क्षेत्रासाठी समर्पित कलापुरी ह्या कोल्हापुरातील स्टार्टअपने अल्पावधीमध्येच देश विदेशात नावलौकिक कमावला आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणाच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या कलापुरीच्या माध्यमातून आज ५०० हून अधिक ग्रामीण महिलांना रोजगार प्राप्त झालेला आहे. ग्रामीण कारागीरांच्या हस्तकौशाल्यातून साकारलेल्या कोल्हापुरी चप्पल, पारंपरिक कोल्हापुरी ज्वेलरी व हँडमेड बास्केट ह्या सारख्या उत्पादनांना कलापुरीच्या माध्यमातून आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे.  ग्रामिण भागातील करगिरांना विशेषत: महिला कारागिरांना कौशल्याधारीत रोजगार निर्मितीचे प्रशिक्षण देणे, ह्या कारागिराना आवश्यक ती सर्व टुल्स व कच्चा माल उपलब्ध करून देणे, कारागिरांनी बविलेल्या हस्तकलेच्या सर्व वस्तूंना देशात व विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देणे व ह्या माध्यमातून स्वयंपूर्ण खेडी व ग्रामस्वराज्य हे महात्मा गांधींचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे कार्य गेल्या १० वर्षांहून अधिक काळ कलापुरी करीत आहे. कलापुरीच्या ह्या कार्याची दखल घेवून आज पर्यन्त महाराष्ट्र शासन, केंद्र शासन व अनेक संस्थांचे पुरस्कार कलापुरीस प्राप्त झाले आहेत. मोरेवाडी – ता. पन्हाळा येथे कलपुरीचे कोल्हापुरी चप्पल युनिट, यळगुड – ता. हातकनंगले येथे पारंपारिक दागिन्यांचे यूनिट व सोनी – ता. मिरज येथे हँडमेड बास्केट युनिटच्या माध्यमातून ग्रामिण भागातील ५०० हून अधिक महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी कलापुरीने उपलब्ध करून दिली आहे. कलापुरीच्या कारागिरांसाठी करोना काळात रेशन वाटप, महिला कारागीरांसाठी सॅनिटरी पॅडसचे वाटप, ग्रामिण महिला कारागीरांसाठी आर्थिक साक्षरतेचे महत्व असे अनेक उपक्रम कलापुरीमार्फत राबविण्यात आले आहेत. ग्रामिण भागातील ज्या महिलांना घरबसल्या रोजगार असावा अशी इच्छा आहे अशा सर्व महिलांना कलापुरीमार्फत मोफत प्रशिक्षण देवून रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. कलापुरीच्या ह्या अभियानात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कलापुरीच्या संस्थापिका सौ. अपर्णा चव्हाण यांनी केले आहे.

व्हि.एम.एलचे क्रिएटिव्ह ग्रुपचे प्रमुख श्री. कल्पेश पाटणकर, कल्पेश, स्नेहा चव्हाण, अनाई भरूचा, विजय, सुजय ह्या सर्वांच्या सहकार्यातून “द कोल्हापुरी” हा प्रकल्प साकार झाला. 
कलापुरी निर्मित “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकास जागतिक स्तरारवर मिळालेला प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे. ह्या सर्व पुरस्कारांचे खरे मानकरी हे कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर आणि कोल्हापूरची जनता आहे. कलपुरीला मिळालेली सर्व अवॉर्डस आम्ही ह्या कारागीर आणि कोल्हापूरच्या जनतेला समर्पित करतो.असे श्री. आतिष चव्हाण, संस्थापक, कलापुरी यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes