SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंदशिवाजी विद्यापीठात पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरूडाचे दर्शन तीन महिन्यांपासून जोडीचे वास्तव्य; समृद्ध व सुरक्षित जैवविविधतेवर शिक्कामोर्तबकुक्कुट पालन प्रशिक्षणार्थींनी संपर्क साधण्याचे आवाहनकोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी तक्रारी दाखल करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी10 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित; कोल्हापूर जिल्ह्यात खतांचा मुबलक साठाजयसिंगपूर येथे नूतन बस स्थानकाच्या इमारतीचा लोकार्पण : एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व सुलभ प्रसाधनगृह मोफत करणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी 50 हजारचे सीड फंडिंग; शिवाजी विद्यापीठ आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय क्रमांक समूह विद्यापीठांनी मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे: राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा कुलगुरूंच्या बैठकीत सल्लाभारतरत्न डॉ. राधाकृष्णन यांच्या स्मृतीस अभिवादनउष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी

जाहिरात

 

कोल्हापूर : बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

schedule17 Apr 26 person by visibility 106 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्याकडून बालिंगा सबस्टेशनकडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे सोमवार, दि.20 एप्रिल 2026 रोजी विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे बालिंगा अशुध्द / शुध्द जल व नागदेववाडी अशुध्द जल उपसा केंद्राकडील विद्युत पुरवठा बंद रहाणार असून या केंद्राकडील पाणी उपसा पुर्णपणे बंद रहाणार आहे. त्यामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावर अवलंबून असणारा चंबुखडी टाकीवरून वितरीत होणा-या भागामध्ये सोमवार, दि.20 एप्रिल 2026 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवार, दि.21 एप्रिल 2026 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.

 

यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशरचौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही. संपूर्ण सी डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज,महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवलक्लब. ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. 

 

तरी या कालावधीत नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes