SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; ३ लाखांच्या एमडीसह तरुण अटकेतगणेश मंडळांना हवे सामाजिक प्रबोधनाचे भान... हिंदी भाषा: भारतीय संस्कृतीचा आणि एकतेचा अनमोल दुवामराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने आणि कायदेशीर तोडगा काढावा: खासदार शाहू छत्रपती महाराजगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीमबालशिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शासनाचा पुढाकार : आमदार यड्रावकरअवकाळीग्रस्त ३६८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३० लाख जमा कोल्हापूर मपालिकेच्यावतीने भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांची जयंती साजरीमहिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'युवावर्स' उत्साहात

जाहिरात

 

कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; ३ लाखांच्या एमडीसह तरुण अटकेत

schedule14 Sep 26 person by visibility 128 categoryगुन्हे

कोल्हापूर  : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरच्या पथकाने मंगळवार पेठ येथील शेळके उद्यान जवळ सापळा रचून केलेल्या कारवाईत तब्बल ३,०४,४०० रुपये किमतीचा १५.२२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (MD) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी सोएब नौशाद शेख (वय २५, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) या तरुणास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोबाईल आणि मोपेड मोटरसायकलसह एकूण ४,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास जुना राजवाडा पोलीस करीत आहेत. 

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आणासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes