कोल्हापुरात वाहतूक शाखेची दमदार मोहीम : १३७ वाहनचालकांवर कारवाई, २,३२,५००/- रुपये दंड वसूल
schedule21 Nov 25 person by visibility 87 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात अल्पवयीन वाहनधारक, विना लायसन्स, तिब्बल सिट, मोबाईल टॉकींग या वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारे १३७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांचेकडून २,३२,५००/- रुपये दंड करण्यात आला. ही कारवाईची मोहीम कोल्हापूर वाहतूक शाखेने केली.
कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरामध्ये अल्पवयीन वाहन चालक यांचेकडे तसेच तरुणवर्ग यांचेकडून शाळा, कॉलेज परिसरामध्ये वाहनांवर बसून हुल्लडबाजी करणे, तिब्बलसिट फिरणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर मोबाईलणे, लायसन्स जवळ न बाळगणे, अस्ताव्यस्त वाहन पार्क करणे तसेच लायसन न काढता वाहन चालविणे अशा प्रकारात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असल्याने मा. अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी दिले सुचनेनुसार आज दिनांक २१.११.२०२५ सकाळी १०.०० ते १२.०० वा. मुदतीत शहरातील विवेकानंद कॉलेज, महावीर कॉलेज, शहाजी कॉलेज, गोखले कॉलेज, न्य कॉलेज या परिसरात वाहतूक शाखेकडील अधिकारी व १८ पोलीस अंमलदा यांची वेगवेगळे पथक तयार करुन त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली.
तरी शहर वाहतुक नियंत्रण शाखा कोल्हापूरचे वतीने सर्व पालकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या अल्पवयीन पाल्यास वाहन चालविण्यास देवू नये, अपघातासारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुण वाहनधारकांनी वाहतुकीचे नियमांचे तंतोतंत पालन करावे. वाहन चालविताना आपले सोबत ड्रायव्हींग लायसन्स व आपले वाहनांच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जवळ बाळगाव्यात अन्यथा वाहनधारकांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली व शहर वाहतुक शाखेकडील पो.नि. नंदकुमार मोरे, यांचे निरीक्षणाखाली सहा. पोलीस निरीक्षक दिपक जाधव नागेश म्हात्रे व पोलीस अंमलदार यांनी केली.