SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी’ अवार्डगोकूळ दूध संघ निवडणूक: महायुतीचे जागावाटप जाहीर; राष्ट्रवादी सर्वाधिक ९ जागांवर लढणार!देशात लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू; मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा: आमदार सतेज पाटील यांचा घणाघातकोल्हापूर : नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिर परिसरासह शहरात विशेष स्वच्छता मोहीमकोल्हापूर : पाणीपट्टी थकबाकी व अनधिकृत कनेक्शनवर कारवाई; उपद्रव शोध पथकाकडून 1.20 कोटींची वसुलीकोल्हापूर : जोतिबा रोड ते महाद्वाररोड परिसरातील हातगाड्यांवर कारवाईसमाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याची जबाबदारी कलावंतांवर: अभिनेते डॉ. मिलिंद शिंदेवंचितांचा सिनेमा म्हणजे केवळ दुःखाचे चित्रण नव्हे : अविनाश भालेजागतिक अभिजात भाषांच्या अनुषंगाने २८ पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदशिवाजी मार्केट फेरीवाला सर्वेक्षण: मुदतवाढ व फॉर्म वाटपासाठी स्वतंत्र व्यवस्था करा : नगरसेवक आश्किन आजरेकर

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी’ अवार्ड

schedule07 Oct 26 person by visibility 194 categoryशैक्षणिक

◼️‘एड्युस्किल्स कॉन्क्लेव्ह’मध्ये  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते मध्ये सन्मान 
◼️स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचाही गौरव 

कोल्हापूर : शैक्षणिक उत्कृष्टता, कौशल्याधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरील ‘एड्युस्किल्स कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये ‘बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी – २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 त्याचप्रमाणे डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागास ‘बेस्ट परफॉर्मिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले. यावेळी एड्युस्किल्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शुभजित जगदेव प्रमुख उपस्थित होते.

एड्युस्किल्स फाउंडेशन हे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजांनुसार कौशल्ये विकसित करण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण, उद्योगाभिमुख शिक्षण, व्हर्च्युअल इंटर्नशिप, सर्टिफिकेशन तसेच प्राध्यापकांच्या कौशल्यवृद्धीसाठी विविध उपक्रम राबविणारे व्यासपीठ आहे. एड्युस्किल्स कॉन्क्लेव्ह देशभरातील शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये सहभागी होतात. कौशल्याधारित शिक्षण, उद्योग–शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविणाऱ्या संस्थात्मक उपक्रमांचा या माध्यमातून गौरव केला जातो.

एड्युस्किल्स फाऊंडेशनसोबत केलेल्या सामंजस्य कराराच्या (एमओयू) माध्यमातून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गुगल, मायक्रोसॉफ्ट, जुनिपर नेटवर्क्स यांसारख्या मल्टिनॅशनल कंपन्यांच्या सहकार्याने क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डेटा अॅनालिटिक्स आणि आयओटी यांसारख्या इमर्जिंग टेक्नॉलॉजीजचे मोफत प्रशिक्षण व सर्टिफिकेशन मिळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्रात सुमारे तीन महिन्यांची विनामूल्य व्हर्च्युअल इंटर्नशिप मिळून प्रकल्पाधारित कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. उपलब्ध आकडेवारीनुसार, सहभागी विद्यापीठांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केल्याची उल्लेखनीय कामगिरी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने नोंदवली आहे.

विद्यापीठाला मिळालेल्या या दोन्ही पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलपती संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. अजित पाटील यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes