वडगांव येथे जुगार अड्ड्यावर छापा, 2,26,710/- रु. रोख रक्कमेसह एकूण 5,20,210/- रु.चा मुद्देमाल जप्त; 56 आरोपीविरुध्द गुन्हा दाखल
schedule16 Aug 24 person by visibility 406 categoryगुन्हे
कोल्हापूर : वडगांव येथे पत्याचे जुगार खेळावर छापा टाकण्यात आला. 2,26,710/- रु. रोख रक्कमेसह इतर जुगाराचे साहित्य असा एकूण 5,20,210/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच व 56 आरोपीविरुध्द गुन्हा दाखल झाला असून ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना माहिती मिळाली की, भजने गल्ली पेठ वडगांव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे रमेश गनबावले यांचे मालकीचे बंदिस्त इमारतीमध्ये पत्याचे पानाचा जुगार खेळ चालू आहे अशी माहिती मिळाली. सदर माहितीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एस. मसुटगे, पोलीस अंमलदार संजय देसाई, संजय पडवळ, बालाजी पाटील, सतीश जंगम, महेश आंबी, महेश खोत, अशोक पवार, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, संतोष बरगे, वैभव पाटील, विजय इंगळे अशा पथकाने जावून भजनी गल्ली पेठ वडगांव येथे बलराम कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ नावाचे बंदीस्त खोलीत पत्याचे पानाचा चालू असले जुगार खेळावर दि. 15 ऑगस्ट रोजी छापा टाकून एकूण 54 आरोपीना पकडले आहेत.
या छापा कारवाईत 2,26,710/- रु. रोख रक्कम, 39 मोबाईल हँन्डसेट व इतर जुगार गुन्हयाचा माल असा एकूण 5,20,210/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. सदर ठिकाणी पकडलेले 54 आरोपी तसेच क्लबचा अध्यक्ष व घरमालक असे एकूण 56 इसमांचे विरुध्द वडगांव पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वडगांव पोलीस ठाणे मार्फत सुरु आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सी.एस. मसुटगे, पोलीस अंमलदार संजय देसाई, संजय पडवळ, बालाजी पाटील, सतीश जंगम, महेश आंबी, अशोक पवार, महेश खोत, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, संतोष बरगे, वैभव पाटील, विजय इंगळे यांनी केली आहे.