SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा ३३ वा हंगाम समाप्त"व्यवसायाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उद्योगशिक्षण या क्षेत्रांचा सुसंवाद आवश्यक"ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - डॉ.राजन गवसडॉ.म.सु.पाटील वैश्विक दृष्टिकोन अंगीकारलेले समीक्षक : प्राचार्य डॉ.दिलीप धोंगडेप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये संत गाडगेबाबा जयंती उत्साहात"ए एस ट्रेडर्सचा 'TRADEWINGS' घोटाळाः फरार संचालक संतोष कुंभारच्या मुसक्या आवळल्या; कोल्हापूर पोलिसांचा मास्टरस्ट्रोक !"'पृथ्वी' झेप: भारतीय संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी क्रांतीचा सुवर्णक्षणकोल्हापूर एलसीबीचा थरारक 'ट्रॅप'; रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त!अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठित करणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलराज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम प्राधान्याने सुरू : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

जाहिरात

 

"व्यवसायाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उद्योगशिक्षण या क्षेत्रांचा सुसंवाद आवश्यक"

schedule25 Feb 26 person by visibility 116 categoryसामाजिक

◼️कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष भारत ओसवाल यांचे प्रतिपादन, वाणिज्य अधिविभागात उद्योग-विद्यापीठ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर : व्यवसायाच्या अपेक्षा पूर्ण करणारी युवा पिढी निर्माण करण्यासाठी उद्योग-शिक्षण या क्षेत्रांचा सुसंवाद आवश्यक आहे असे प्रतिपादन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष भारत वसवाल ओसवाल यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्यावतीने पीएम-उषा योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या उद्योग विद्यापीठ सुसंवाद कार्यक्रमांमध्ये उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन होते.

महेंद्र ज्वेलर्सचा उद्योजकीय प्रवास उलगडताना त्यांनी विद्यार्थ्यांना काही महत्वाच्या टिप्स दिल्या "कष्ट व काम करण्याची तयारी ठेवल्यास पैसा आपोआप येईल. सुवर्णालंकार व्यवसायातील नवोपक्रम अंगीकारल्यामुळे व्यवसायाचा विकास होत गेला ध्येय निश्चित करून त्यावर काम करा प्रामाणिकपणावर स्पर्धेत टिकून राहता येते. प्रतिभा गुण आणि मेहनत यावर युवकांना संधी आहे. समस्या सोडवणुकीचे, टीम-वर्कचे, वेळेच्या शिस्तीचे कौशल्य प्राप्त करा, तरच आपल्याला टिकता येईल असे आवाहन ओसवाल यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. महाजन म्हणाले की, शिक्षण क्षेत्राचा उद्योग-व्यवसायाशी संवाद अत्यंत आवश्यक असून अभ्यासक्रम, संशोधन, आंतरवासिता आणि कर्मचारी नियुक्ती या विविध गोष्टींसाठी दोन्ही क्षेत्रांना तो लाभदायक आहे.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. केदार मारुलकर यांनी केले. तर डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले.

दुसऱ्या सत्रात समर्थ ग्रुप ऑफ कॅम्पनीजचे व्यवस्थापकीय संचालक  संजय कारखानीस यांनी संवाद साधला. ते म्हणाले कि, "जीवनामध्ये ३ एफ हे पर्याय असतात. तो निवडण्यासाठी व्यवसायातील प्रत्यक्ष ज्ञान, कौशल्ये, प्रज्ञा व आणि वृत्ती यांचा अंगीकार करा आणि तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करा. ज्ञान असण्याच्या नोकऱ्या संपणार आहेत पण ज्ञानाचे उपयोजन असणाऱ्या नोकऱ्या असणारच आहेत. त्यासाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे." दैनिक लघु सुधारणा, पी डी सी सायकल, पेस्ट्ल कॉनतेक्स्स या संकल्पनेचा वापर प्रभावी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

तिसऱ्या सत्रात Adapt Consultant चे अमित माटे यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन केले तसेच व्यवस्थापन सल्लागार या व्यवसायाची माहिती दिली.

चौथ्या सत्रात पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले होते त्मामध्ये चार्टर्ड अकौंटट गिरीश सामंत, व्यवस्थापन सल्लागार डॉ. महादेव शिंदे, माजी विद्यार्थी प्रा. डॉ. अनिल सूर्यवंशी, उद्योग-विद्यापीठ सुसंवाद कक्षाचे समन्घ्यक डॉ. सागर डेळेकर यांनी भाग घेतला. सदर सत्राची अध्यक्षता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केली. या सत्राचे प्रास्ताविक डॉ. केदार मारुलकर यांनी केले. तर डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  युवराज टिपुगडे, श्रीमती मंजिरी कांबळे,  प्रेषित कांबळे, श्रीमती धनेश्वरी शिंदे,  हरीश कांबळे,  भरत रावण,  सुरज,  तुषार पाटील आणि सामी मुल्ला यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes