SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन‘गोकुळ’ मार्फत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात सांगलीतील बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या शिवराज कामतेचे देदीप्यमान यशआंबेडकर जयंतीनिमित्त हेरवाडमध्ये आरोग्यसेवेचा स्तुत्य उपक्रम : ४० लिटर कफ सिरपचे वितरणबाबासाहेबांचे संविधान म्हणजे...एकसंघ भारताची पोलादी चौकटकर्तव्यासाठी समर्पण: राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनरांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंदकोल्हापूर एलसीबीचा मोठा दणका: भरदिवसा घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; १५ लाखांचा मुद्देमाल जप्तभरदिवसा घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त ए. आय. - बायोमेकॅनिक्सचा योग्य समन्वय गरजेचा : डॉ.सुदीप काळे

जाहिरात

 

कोल्हापूर एलसीबीचा थरारक 'ट्रॅप'; रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त!

schedule24 Feb 26 person by visibility 312 categoryगुन्हे

कोल्हापूर: जिल्ह्यात गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली सापळा रचून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ऋषिकेश उर्फ सोन्या रामू कुऱ्हाडे (रा. राजारामपुरी) याला बेकायदेशीर गावठी बनावटीच्या पिस्तुलासह बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत ५०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, शहरात खळबळ उडाली आहे.


पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जालिंदर जाधव यांचे पथक गस्त घालत असताना, अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून सोन्या कुऱ्हाडे हा पिस्तुलासह शाहू टोल नाक्याजवळ येणार असल्याची पक्की माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ उड्डाणपुलाखाली फिल्डिंग लावली. संशयित सोन्या कुऱ्हाडे तिथे येताच पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये घातक गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस आढळून आले.


तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पिस्तुल त्याचा मित्र आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास देवदास वाघमारे उर्फ पांडा शेट (रा. लक्ष्मीपुरी) याने दिल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या 'पांडा शेट' फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या दोन्ही आरोपींवर राजारामपुरी आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी 'भारतीय हत्यार कायद्यान्वये' गुन्हा नोंदवण्यात आला असून, हे पिस्तुल नक्की कोणत्या घातपातासाठी आणले होते, याचा तपास आता युद्धपातळीवर सुरू आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes