श्रीमती सुधाताई कांबळे यांना "आदर्श माता पुरस्कार" प्रदान
schedule12 Mar 25 person by visibility 178 categoryसामाजिक

कोल्हापूर : सामाजिक सेवाभावी संस्था आदर्श फाऊंडेशन चा वतीने पर्सन ऑफ द इयर 2025 पुरस्काराचे वितरण श्री छत्रपती शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. विविध मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी आपले हॅलो प्रभात चे प्रतिनिधी सचिन कांबळे यांच्या आई यांना पर्सन ऑफ द इयर 2025 चा पुरस्कार श्रीमती सुधाताई वसंत कांबळे यांना देण्यात आला. त्यांच्या जीवनाची यशोगाथा त्यांनी एका दिव्यांग व्यक्ती बरोबर विवाह करून आपल्या आईच्या ( आजी) आशीर्वादाने आधाराने पतीच्या खांद्याला खांदा लावून आपला संसार अतिशय सुंदर करून दोन मुले उच्च शिक्षण घेऊन सुरळीत आहेत. एक मुलगा शिक्षक आहे दुसरा एक खाजगी कॉलेजमध्ये कामगार विभाग प्रमुख आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी खासदार निवेदिता माने , श्रीमती नेत्रदीपा पाटील, शिवाजी सुतार, रवींद्र रायकर , बाळासाहेब लोहार, डॉ दगडू माने, श्री विलास आंग्रे, सुदामराव गायकवाड, संस्थापक विजय लोहार, वनिता लोहार, सानिका लोहार, इत्यादी उपस्थितीत होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजयोगिनी चोरडिया, स्वागत आणि प्रास्ताविक डॉ दगडू माने यांनी केले
.