SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासनशिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक जयंती उत्साहातहज यात्रेकरू कोल्हापुरात दाखल !! हज फाऊंडेशन आणि लिम्रास ट्रस्टच्यावतीने जोरदार स्वागत

जाहिरात

 

‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटातून अभिनेत्री रेश्मा वायकर यांचे पदार्पण

schedule12 Mar 25 person by visibility 427 categoryमनोरंजन

▪️९ मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट होणार प्रदर्शित

कोल्हापूर  : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिला प्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिला प्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे.  आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’  या सस्पेन्स थ्रीलर  चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटातून अभिनेत्री रेश्मा वायकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. 

‘शातिर THE BEGINNING’ असे या  चित्रपटाची कथा- सुनील वायकर आणि हेमंत एदलाबादकर यांची आहे. तर पटकथा आणि दिग्दर्शन सुनील वायकर यांनी केले असून त्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली  रेश्मा वायकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले असून गीतकर वैभव देशमुख यांच्या गीतांना वैशाली सामंत, शाल्मली खोलगडे यांचा स्वरसाज आहे.

पदार्पणातील भूमिकेबद्दल बोलताना रेश्मा वायकर म्हणाल्या, पहिला चित्रपट करताना काहीतरी हटके भूमिका असायला पाहिजे हे मी ठरवले होते. आज आपल्या समाजात अंमलीपदार्थ सहजतेने मिळत आहेत, ते घेणाऱ्या तरुणाईचे प्रमाण वाढत आहे, विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर अशाच प्रकरणामुळे मधल्या काळात चर्चेत होते. या दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध लढा देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईची ही कथा आहे. अॅक्शन पॅक्ड अशा नायिका,  एक सामाजिक संदेश देणारी व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. 

या चित्रपटात रेश्मा वायकर यांच्यासह मीर सरवर, योगेश सोमण, रमेश परदेशी, अनिल नगरकर, अभिमन्यू वायकर, वेद भालशंकर, श्रेया कुलकर्णी, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी ‘शातिर THE BEGINNING’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes