SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणारमुख्याध्यापिका सविता पाटील यांना राज्यस्तरीय 'आयडियल टीचर' पुरस्कार प्रदानकळंबा येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाईचा १९ वा उत्सव सोहळा ९ मे पासून; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनविश्वकवी रवींद्रनाथ टागोर: भारतीय साहित्याचा मानदंडलिंकिंग केल्यास कठोर कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडडिजिटल युगात 'सायबर प्रतिकारशक्ती' काळाची गरज - राज्य महिला आयोगाच्या बैठकीत विचारमंथनविविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावाडी .वाय. पाटील अभियांत्रिकीच्या प्रा प्रल्हाद गवळी यांना पीएच. डी.डीवायपी साळोखेनगरच्या विद्यार्थ्यांचे 'अभियंता करंडक' आणि 'वसंत करंडक' स्पर्धेत यशविनायक भोसले यांचा 'लायन्स गौरव' पुरस्काराने सन्मान

जाहिरात

 

मुख्याध्यापिका सविता पाटील यांना राज्यस्तरीय 'आयडियल टीचर' पुरस्कार प्रदान

schedule07 May 26 person by visibility 164 categoryसामाजिक

कोल्हापूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या कार्यतत्पर मुख्याध्यापिका प्राचार्या  सविता पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'राज्यस्तरीय आयडियल टीचर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऑनलाइन वृत्तपत्र 'गंगाधर' यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील हॉटेल रॉयल पॅव्हेलियनमध्ये आयोजित एका विशेष समारंभात गारगोटी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा अक्काताई नलवडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन  पाटील यांचा गौरव करण्यात आला.

 सविता पाटील यांची निवड शालेय शिक्षण आणि सामाजिक कार्य या विभागातून करण्यात आली आहे. त्यांची प्रशासकीय उपक्रमशीलता, विविध विषयांवरील व्यासंग आणि तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी दिलेले योगदान या निवडीसाठी महत्त्वपूर्ण ठरले. प्रशिक्षक शिबिरांमधील त्यांचे मार्गदर्शन आणि विविध समित्यांवरील त्यांची सक्रिय नियुक्ती, तसेच 'डी. बी. पाटील शैक्षणिक व सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट' व 'रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्स'च्या माध्यमातून त्यांनी केलेले सामाजिक कार्य यांची दखल घेऊन हा सन्मान त्यांना देण्यात आला.

या दिमाखदार सोहळ्याला संपादक कमलाकर वर्टेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष  तानाजी पाटील, कागल पंचायत समितीच्या सदस्या  तेजस्विनी भोरे, ज्येष्ठ शिक्षक नेते दादासाहेब लाड, डॉ. स्मिता गिरी, राजेंद्र पाटील यांच्यासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशाबद्दल सविता पाटील यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes