संजय घोडावत आय बी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले 'कृषीवा' शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण
schedule23 Jan 25 person by visibility 355 categoryशैक्षणिक
अतिग्रे : येथील संजय घोडावत आय बी स्कुलचे विद्यार्थी राघव सामानी आणि मिथिल साळुंखे यांनी ‘कृषीवा’ या नावाने एक सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मंथन पटकी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजवर्धन पिसे, आरोही महाडीक, चीफ फाइनेंसियल ऑफिसर, शिबम घोष चीफ डिजिटल ऑफिसर यांच्या सहकार्याने या विद्यार्थ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पूर व्यवस्थापन आणि शेती विकासाचे आधुनिक साधन विकसित केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूर भागाला दरवर्षी पूराचा फटका बसतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम होतो. या समस्येवर उपाय म्हणून ‘कृषीवा’ उपग्रह इमेजरी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून पूर येण्यापूर्वीच पूरजन्य स्थिती ओळखण्याचे तंत्र विकसित केले आहे.
‘कृषीवा’ या तंत्रज्ञानाला बीआयटीएस पिलानी या प्रतिष्ठित संस्थेची तांत्रिक भागीदारी आणि डॉ. राम सिंग यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या प्रकल्पामध्ये पूर क्षेत्राचा अचूक अंदाज लावून शेतकऱ्यांना वेळेत उपाययोजना करता येतील. याशिवाय, बँका, विमा कंपन्या आणि स्वयंसेवी संस्था यांना पूर परिस्थितीत प्रभावी मदत पोहोचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल.
'कृषीवा' उपक्रमाने खाजगी व सार्वजनिक बँका, विमा कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.
राघव, मिथिल, मंथन, आणि राजवर्धन, आरोही व शिभम यांच्या नेतृत्वाखाली कृषीवा उपक्रम शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा घडवेल. हे तंत्रज्ञान केवळ पूर व्यवस्थापनापुरते मर्यादित न राहता शाश्वत शेतीसाठी नवा मार्ग दाखवत आहे. असे मत संचालिका सास्मिता मोहंती यांनी व्यक्त केले.
या विद्यार्थ्यांचे संस्थापक संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले संचालिका सस्मिता मोहंती, समन्वयक बोनीला सिन्हा यांनी अभिनंदन केले.
कृषीवा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी नवीन आशा आणि उज्ज्वल भविष्याचा किरण ठरत आहे.