कोल्हापूर: चिकोत्रा नदी भागामध्ये उपसाबंदी लागू
schedule04 Dec 25 person by visibility 76 categoryराज्य
कोल्हापूर : चिकोत्रा प्रकल्पाच्या चिकोत्रा नदी भागामध्ये पाटबंधारे विभाग (दक्षिण)चे कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे यांनी पाटबंधारे अधिनियम 1976 नुसार शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसाबंदी लागू केली आहे.
चिकोत्रा नदी को.प. बंधारा 1 ते को.प. बंधारा 29 (बेळुंकी) वर 7 डिसेंबर 2025 पर्यंत, 27 डिसेंबर ते 4 जानेवारी 2026, 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी ते 1 मार्च, 15 ते 23 मार्च, 6 ते 14 एप्रिल, 28 एप्रिल ते 6 मे, 20 ते 28 मे याप्रमाणे प्रत्येकी 9 दिवस उपसाबंदी करण्यात आली आहे.
उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसा यंत्र जप्त करुन परवानाधारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल. होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असे पाटबंधारे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.