SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महायुतीच्या विजयाचे भगवे वादळ राज्यभर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपोस्टल मतदानाद्वारे आज 442 मतदानस्वयंसेवी संस्थांनी आपल्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत ; डॉ. महेश ठाकूर यांचे प्रतिपादन मतदार जनजागृतीसाठी ''मतदान दौड'' संपन्नजाहिरात परवानगीसाठी सोमवार दुपारपर्यंतच मुदत; प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदीप्रभागाच्या सर्वांगीण संतुलित विकासाचे ध्येय बाळगणाऱ्या ओंकार जाधव यांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद; महिलांची प्रचार फेरीकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 : आलिय नासिर गोलंदाज यांची प्रचारामध्ये आघाडी; मतदारांचा वाढता प्रतिसादसत्यजित जाधव, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात गती; मतदारांकडून वाढता प्रतिसादआरटीई 25 टक्के ऑनलाईन विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतंर्गत शाळा नोंदणी सुरुपदवीधर व शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी 12 जानेवाला प्रसिध्द

जाहिरात

 

मतदार जनजागृतीसाठी ''मतदान दौड'' संपन्न

schedule10 Jan 26 person by visibility 159 categoryसामाजिकमहानगरपालिका

🔹कोल्हापूरकरांना जास्तीत जास्त मतदानाचे आवाहन

  कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अभियानाचा एक भाग म्हणून आज सकाळी ''मतदान जनजागृती दौड'' चे आयोजन करण्यात आले. या दौडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के. मंजूलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते बिंदू चौक येथून पांढरा झेंडा दाखवून करण्यात आला. या जनजागृती दौडीत शहरातील विविध महाविद्यालयांमधील एक हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

  रॅलीपूर्वी यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ''मतदार राजा जागा हो'' हे प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून ''मतदानासाठी बाहेर पडा'', ''अमिषाला बळी पडू नका'' आणि ''निर्भयपणे मतदान करा'' असे संदेश देण्यात आले. या नाट्याचे मार्गदर्शन प्रा. तोरस्कर, प्रा. कुमुदिनी झीटे व कॅ. अमित रेडेकर यांनी केले.

  या प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ''प्रत्येक निवडणुकीत कोल्हापूरचा मतदानाचा टक्का राज्यात अग्रस्थानी राहिला आहे. यंदाही कोल्हापूरने उच्चांकी मतदान करून महाराष्ट्रात आपले नाव उज्वल करावे. 15 जानेवारीची सुट्टी ही मतदानासाठीच असून, सर्वांनी आपला हक्क बजावावा.

  प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले की, ''लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानासाठी बाहेर पडणे आवश्यक आहे. कोल्हापूरची मतदान टक्केवारी राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. भावी पिढीच्या भवितव्यासाठी 90 टक्क्यांहून अधिक मतदानाचे लक्ष्य गाठूया''.

  पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनीही कोल्हापूरकरांना आवाहन करताना सांगितले की, ''मतदान हे आपले कर्तव्य आहे. कोल्हापूरने परंपरेप्रमाणे यंदाही अधिक मतदान करून आदर्श निर्माण करावा.''

  या प्रसंगी बिंदू चौक येथे मतदार जनजागृतीपर रांगोळी काढण्यात आली. ही रांगोळी कलाकार अनंत यादव आणि महेश पोवार यांनी साकारली. तसेच शहरातील होर्डिंग असोसिएशनने महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत 15 ठिकाणी मोफत जनजागृती होर्डिंग्ज लावले.हि ''मतदान दौड'' बिंदू चौक–छत्रपती शिवाजी महाराज चौक–महापालिका–दसरा चौक–खानविलकर पेट्रोल पंप–महावीर उद्यान या मार्गावर पार पडली. या रॅलीत के.एम.सी., गोखले, महावीर, शहाजी, न्यू, शाहू आणि राजाराम कॉलेजमधील एनएसएस, एनसीसी व क्रीडा विभागातील विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी आणि फलकाद्वारे मतदार जनजागृती केली.

  या दौड रॅलीचे आयोजन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार, केएमसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाबासो उलपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

  यावेळी मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा वित्त अधिकारी राजश्री पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्रे, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड, तसेच होर्डिंग असोसिएशनचे ज्ञानदेव पाटील, मानिक ठाकूर आणि अक्षय पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes