SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत; महाविद्यालयात यंदाही १०० टक्के प्रवेशईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; २ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात १०० टक्के नोंदणीसाठी मोहीमकोल्हापूरचे नगरसेवक आश्किन आजरेकर आणि राज कोरगावकर यांनी मुंबईतील ‘हायरॉक्स’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले यश!गौरी-गणपती विसर्जन मार्गांवर महापालिकेचे युद्धपातळीवर पॅचवर्कसेवा संकल्प अभियांनातर्गत अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांची बेघर निवारा केंद्रांना भेटगोकुळची निवडणूक बिनविरोध होणे अशक्यच! मंत्री हसन मुश्रीफ यांचा विरोधकांवर हल्लाबोल; दूध संघाच्या राजकारणावर स्पष्टोक्तीहुपरीत साकारणार ६०० कोटींचा देशातील पहिला 'झिरो वेस्ट' बहुराज्यीय प्रकल्प; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी होणार पायाभरणी९० दिवसांचा अल्टिमेटम अन् थेट मुंबईत धडकण्याचा इशारा; जरांगे पाटलांचे उपोषण सुटले, पण लढा सुरूच!सेवा संकल्पातून लोकाभिमुख प्रशासन महिनाभराचा उपक्रम ; प्रशासन जनतेच्या दारीमराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय

जाहिरात

 

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत; महाविद्यालयात यंदाही १०० टक्के प्रवेश

schedule17 Sep 26 person by visibility 155 categoryराज्य

कोल्हापूर : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष बी.आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यंदाही महाविद्यालयात १०० टक्के प्रवेश पूर्ण झाला आहे. यावेळी सर्वाधिक गुणांसह प्रवेश घेणाऱ्या गायत्री देशपांडे हिचा कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

 यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, वास्तुशास्त्र हे केवळ इमारतींच्या रचनेपुरते मर्यादित नसून समाजाच्या गरजा, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि मानवी जीवनशैली यांचा विचार करणारे व्यापक क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबत सर्जनशीलता, तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करून भविष्यातील आव्हानांसाठी स्वतःला तयार करावे. वास्तुशास्त्राच्या क्षेत्रातील बदलत्या संधी, व्यावसायिक कौशल्ये आणि वास्तुविशारद म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती त्यानी दिली. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून सर्जनशीलता आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करावीत असे आवाहन त्यानी केले. 

प्राचार्य डॉ. संजय एस. पवार म्हणाले, महाविद्यालयाला मिळालेले १०० टक्के प्रवेशाचे यश हे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विद्यार्थी आणि पालकांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कौशल्यांना नवी दिशा द्यावी.

स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे विभागप्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव यांनी अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक उपक्रम, विभागातील सुविधा तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती दिली. त्यानंतर नव्या विद्यार्थ्यांना स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील विविध विभाग, प्रयोगशाळा व शैक्षणिक सुविधांची प्रत्यक्ष भेटीतून माहिती देण्यात आली.  

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील,  उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय एस. पवार, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रवेश विभागप्रमुख आर. जी. बेन्नी  यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रवेश समन्वयक प्रा. तिलोत्तमा पाडळे आणि प्रा. मनजीत जाधव यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes