SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गौरी-गणपती विसर्जन मार्गांवर महापालिकेचे युद्धपातळीवर पॅचवर्कसेवा संकल्प अभियांनातर्गत अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांची बेघर निवारा केंद्रांना भेटगोकुळची निवडणूक बिनविरोध होणे अशक्यच! मंत्री हसन मुश्रीफ यांचा विरोधकांवर हल्लाबोल; दूध संघाच्या राजकारणावर स्पष्टोक्तीहुपरीत साकारणार ६०० कोटींचा देशातील पहिला 'झिरो वेस्ट' बहुराज्यीय प्रकल्प; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी होणार पायाभरणी९० दिवसांचा अल्टिमेटम अन् थेट मुंबईत धडकण्याचा इशारा; जरांगे पाटलांचे उपोषण सुटले, पण लढा सुरूच!सेवा संकल्पातून लोकाभिमुख प्रशासन महिनाभराचा उपक्रम ; प्रशासन जनतेच्या दारीमराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्यायजागतिक रुग्ण सुरक्षा दिन: सुरक्षित वैद्यकीय सेवा आणि आपली जबाबदारीगोकुळ निवडणुक: दुसऱ्या दिवशी माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह १२ उमेदवारांचे अर्ज दाखललोकोपयोगी कामे करुन सेवा संकल्प अभियान यशस्वी करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जाहिरात

 

गौरी-गणपती विसर्जन मार्गांवर महापालिकेचे युद्धपातळीवर पॅचवर्क

schedule17 Sep 26 person by visibility 72 categoryमहानगरपालिका

  ◼️‘इन्स्टा रोड पॅचर’सह डांबरी पॅचवर्कच्या कामांना वेग; आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडून पाहणी

  कोल्हापूर : घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्ते व मिरवणूक मार्ग सुस्थितीत ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे व डांबरी पॅचवर्कचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आधुनिक ‘इन्स्टा रोड पॅचर’ मशीनच्या सहाय्याने तसेच महापालिकेच्या यंत्रणेमार्फत हे काम करण्यात येत आहे. या कामाची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज सर्किट हाऊस परिसरात केली. यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पवार व कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे उपस्थित होते.

  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाने उघडीप दिल्यानंतर चारही विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून शहरातील मुख्य रस्ते, मिरवणूक मार्ग तसेच विसर्जन मार्गावरील पॅचवर्कच्या कामांना गती देण्यात आली आहे. बहुतांश मुख्य रस्त्यांवरील कामे पूर्ण करण्यात आली असून उर्वरित ठिकाणीही आवश्यकतेनुसार पॅचवर्क करण्यात येत आहे.

  ◼️आज दि १७/०९/२०२६ रोजी पॅचवर्क केलेली कामे ....

  ▪️विभागीय कार्यालय क्र. 1 – गांधी मैदान
  इंदिरा सागर हॉटेल, संभाजीनगर ते कळंबा तलाव, संभाजी नगर एसटी स्टॅन्ड ते देवकर पाणंद, इराणी खण या रस्त्यावर ‘इन्स्टा रोड पॅचर’च्या माध्यमातून पॅचवर्क करण्यात आले.  तसेच संभाजीनगर ओम तरुण मंडळ, क्रिडा संकुल रोड, एनसीसी ग्राऊंड, दिलीप देसाई इंग्लिश स्कूल समोरील रस्त्यावर महापालिकेमार्फत डांबरी पॅचवर्क करण्यात आले आहे.

  ▪️विभागीय कार्यालय क्र. २ – छत्रपती शिवाजी मार्केट :
  गंगावेश चौक ते पंचगंगा घाट या रस्त्यावर ‘इन्स्टा रोड पॅचर’च्या माध्यमातून पॅचवर्क करण्यात आले. तसेच बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी चौक, रंकाळा चौपाटी ते रंकाळा स्टँड आणि गंगावेश ते पापाची तिकटी चौक या प्रमुख रस्त्यांवर महापालिकेमार्फत डांबरी पॅचवर्क करण्यात आले आहे.

  ▪️विभागीय कार्यालय क्र. ३ – राजारामपुरी :
  दिलबहार तालीम चौक तसेच दसरा चौक ते गोकुळ हॉटेल चौक या मुख्य रस्त्यांवर ‘इन्स्टा रोड पॅचर’ च्या माध्यमातून पॅचवर्क करण्यात आले. शाहू टोल नाका ते उड्डाणपूल, अग्निमारुती मंदिर ते माऊली पुतळा चौक, टेंबलाईवाडी मंदिर परिसर तसेच उमा टॉकीज चौक ते माऊली पुतळा या रस्त्यांवर महापालिकेमार्फत डांबरी पॅचवर्क करण्यात आले आहे.

  ▪️विभागीय कार्यालय क्र. ४ – छत्रपती ताराराणी मार्केट :
  कसबा बावडा विसर्जन मार्गावरील मुख्य रस्ता, भगवा चौक, छावा चौक, कसबा बावडा मेन रोड तसेच राजाराम विसर्जन मार्गावर ‘इन्स्टा रोड पॅचर’च्या माध्यमातून पॅचवर्क करण्यात आले. तसेच एस.टी. स्टँड परिसर, पंचशील हॉटेल, छत्रपती ताराराणी चौक ते दाभोळकर कॉर्नर आणि सर्किट हाऊस ते लाईन बाजार या मुख्य रस्त्यांवर महापालिकेमार्फत डांबरी पॅचवर्क करण्यात आले आहे.

  गणेशोत्सव काळात नागरिकांना तसेच गणेश मंडळांच्या मिरवणुकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये आणि विसर्जन मार्ग सुरक्षित व सुस्थितीत राहावेत यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागांकडून रस्ते दुरुस्तीची कामे सातत्याने करण्यात येत आहेत. ही सर्व कामे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुण गुजर व निवास पवार यांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes