SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
५ दिवसांच्या बँकिंगच्या मागणीसाठी बँक युनियनची आज देशभरात निदर्शने; संपाचाही दिला इशाराप्लास्टिक, अस्वच्छता व उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; उपद्रव शोध पथकामार्फत 465 व्यक्तींकडून 3 लाख 72 हजारांचा दंड वसूलराधानगरी धरण 100 टक्के भरले; जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखालीडेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंधासाठी महापालिकेची युद्धपातळीवर उपाययोजनाडी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंतीसर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र; अवसायनातील सर्वच दूध संस्थांच्या मतदानाचा मार्ग मोकळा15 ऑगस्टला इचलकरंजीत मोफत 'बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प 2026बहुजनांच्या हाताला रोजगार आणि उद्योजक बनवणारी एमआयडीसी उभारण्यात यशस्वी व्हा..'वारणा' ची म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपया तर गाय दुधास १ रुपया दरवाढ ; आमदार डॉ. विनय कोरे यांची माहितीतरुणांची ऊर्जा आणि देशाचे भविष्य: आंतरराष्ट्रीय युवा दिन

जाहिरात

 

राधानगरी धरण 100 टक्के भरले; जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली

schedule12 Aug 26 person by visibility 126 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुमारे 8.34 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 3 खुला असून सध्या धरणातून स्वयंचलित दरवाज्यामधून 1428 व पावर हाऊसमधून 1400 असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे व हळदी, दूधगंगा नदीवरील- सुळकूड असे एकूण 12 बंधारे पाण्याखाली आहेत. 

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी )- राधानगरी 8.34 (100 टक्के), तुळशी 3.40 (98 टक्के), वारणा 30.85 (90 टक्के), दूधगंगा 22.34 (88 टक्के), कासारी 2.42 (87 टक्के), कडवी 2.52 (100 टक्के), कुंभी 2.50 (92 टक्के), पाटगाव 3.30 (89 टक्के), चिकोत्रा 1.14 (75 टक्के), चित्री 1.89 (100 टक्के), जंगमहट्टी 1.22 (100 टक्के), घटप्रभा 1.56 (100 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 1.24 (100 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (34 टक्के),कोदे ल.पा. 0.21 (100 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 20.5, सुर्वे 20.1, रुई 48, इचलकरंजी 46.2, तेरवाड 41.6,  शिरोळ 32.6, नृसिंहवाडी 28.6 फूट इतकी पाणीपातळी आहे.

◼️जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.90 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 63.8 मिमी पावसाची नोंद

कोल्हापूर : जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 63.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 4.2 मिमी, शिरोळ -2.1 मिमी, पन्हाळा- 10.5 मिमी, शाहुवाडी- 12.7 मिमी, राधानगरी- 23.7 मिमी, गगनबावडा- 63.8 मिमी, करवीर- 8 मिमी, कागल- 9.8 मिमी, गडहिंग्लज- 9.5 मिमी, भुदरगड- 11.5 मिमी, आजरा- 22.5 मिमी, चंदगड- 13.3 मिमी असा एकूण 13.90 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes